कोळे पाणलोट प्रकरण : भ्रष्टाचार प्रकरणी सरपंचाची उचलबांगडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 04:38 AM2018-06-12T04:38:59+5:302018-06-12T04:38:59+5:30
म्हसळा तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत कोळे येथील एकात्मिक विकास पाणलोट प्रकल्पातील भ्रष्टाचार प्रकरणाची अनेक वर्षांपासून चौकशी सुरू होती.
म्हसळा - तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत कोळे येथील एकात्मिक विकास पाणलोट प्रकल्पातील भ्रष्टाचार प्रकरणाची अनेक वर्षांपासून चौकशी सुरू होती. या प्रकरणातील तक्रारदार एन.के.जाधव व पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या लढ्याला अखेर यश आले. ग्रामपंचायत कोळे येथील पाणलोट भ्रष्टाचारप्रकरणी ज्या सरपंचावर आरोप करण्यात आले होते, ते सरपंच अमोल शंकर पेंढारी यांना बडतर्फ करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नुकतेच दिले आहेत. या आदेशामुळे म्हसळा तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमधील पाणलोट प्रकरणातील भ्रष्टाचार उघड होणार असून अनेक आजी-माजी सरपंचांचे धाबे दणाणले आहे.
म्हसळा तालुक्यातील कोळे ग्रामपंचायतीमध्ये २०११-१२ पासून एकात्मिक पाणलोट विकास प्रकल्प सुरू करण्यात आले आहे. प्रकल्प सुरळीत चालावे म्हणून एक समिती नेमण्यात आली असून अध्यक्ष अमोल शंकर पेंढारी होते.
पेंढारी यांनी स्वत:च्या पत्नीच्या नावे पाणलोट प्रकल्पांतर्गत मंजूर करण्यात आलेल्या कामांचे ठेके घेतले आहेत. तसेच अन्य कामांमध्येही भ्रष्टाचार केल्याचा आरोप तक्र ारदार नारायण जाधव व पंचक्र ोशीतील ग्रामस्थांनी केले होते. सदर प्रकरणी पंचायत समिती म्हसळा गटविकास अधिकारी यांनी जबाब देऊन पेंढारी यांनी पदाचा गैरवापर केला असल्याचा ठपका ठेवत पुढील चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पत्र पाठविले होते. या सर्व प्रकरणाची जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी चौकशी करून पेंढारी हे ग्रामपंचायत कोळेचे सदस्य राहण्यास अनर्ह ठरविण्यात येत आहेत असा आदेश दिला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णयामुळे सरपंचाच्या मनमानी, भ्रष्टाचारी कारभाराला लगाम लागणार आहे. यापुढे कोळे नव्हे तर सर्वच ग्रामपंचायतीतील सरपंच आपल्या पदाचा मान राखून काम करतील.
- राजेंद्र विचारे,
पंचक्र ोशी संघटक
भ्रष्टाचाराला समूळ नष्ट करण्यासाठी पंचक्र ोशीतील शिलेदारांनी सहकार्य केल्यामुळेच सरपंचाला बडतर्फ करणे शक्य झाले आहे.
- डी.टी.विचारे,
पंचक्र ोशी अध्यक्ष
कोळे ग्रुप ग्रामपंचायतीतील आजवरच्या इतिहासातील काळिमा फासणारी ही घटना आहे. स्वत:च्या पदाचा गैरवापर करून नागरिकांच्या पैशाचा गैरवापर करणे चुकीचे आहे.
- सतीश रा. शिगवण, सचिव, स्थानिक विकास समिती
पाणलोट प्रकल्प तसेच ग्रामपंचायतीकडून करण्यात येणाºया कामात भ्रष्टाचार होतच असतो, मात्र याविरोधात तक्रार कोण करणार, पाठपुरावा कोण करणार, असा प्रश्न आहे. कोळे ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराचे सर्व पुरावे संबंधित सर्व अधिकाºयांना देऊनही, निर्णय घेण्यास प्रशासनाला तब्बल तीन वर्षे लागली. मात्र बडतर्फीच्या निर्णयामुळे ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराला आळा बसेल.
- नारायण जाधव,
तक्र ारदार कोळे ग्रामपंचायत