सरपंच कावजी यांची शेकापमधून हकालपट्टी
By Admin | Published: February 15, 2017 04:50 AM2017-02-15T04:50:36+5:302017-02-15T04:50:36+5:30
खंडाळा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नासिकेत कावजी आणि त्यांची पत्नी विद्यमान सरपंच सुचिता कावजी यांनी पक्षाविरोधात
अलिबाग : खंडाळा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नासिकेत कावजी आणि त्यांची पत्नी विद्यमान सरपंच सुचिता कावजी यांनी पक्षाविरोधात काम केले असून पदाचा दुरु पयोग करून भ्रष्टाचार केला. त्यामुळे दोघांचीही शेतकरी कामगार पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
नासिकेत कावजी आणि सुचिता कावजी यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या नियमांचे पालन न करता मनमानी कारभार केला. तसेच सरपंच पद असताना जनतेच्या हितासाठी काम न करता स्वत:चा स्वार्थ साधला. पदाचा दुरुपयोग करून भ्रष्टाचार केला. त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पक्षाविरोधात जाऊन भ्रष्टाचार करणाऱ्या नासिकेत कावजी व सुचिता कावजी यांची शेतकरी कामगार पक्षातून हकालपट्टी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शेतकरी कामगार पक्ष सामाजिक बांधिलकी जपणारा पक्ष असून जनतेशी त्याची नाळ जोडलेली आहे. त्यामुळे जनतेच्या विरोधात जाऊन काम करणाऱ्या नासिकेत कावजीसह सुचिता कावजीसारख्या भ्रष्टाचारी कार्यकर्त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे. सुचिता कावजी यांचे सरपंचपदसुद्धा काढून टाकण्यात आले आहे. नासिकेत कावजी आणि पत्नी सुचिता कावजी यांचा यापुढे शेतकरी कामगार पक्षाशी कोणताही संबंध असणार नाही, असे शेतकरी कामगार पक्षाचे अलिबाग तालुका चिटणीस अनिल पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)