नेरळच्या कचऱ्यावर मार्ग काढण्यासाठी सरपंच सरसावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2019 11:51 PM2019-06-03T23:51:22+5:302019-06-03T23:51:33+5:30

कायमस्वरूपी उपायासाठी प्रयत्न : नेरळ ग्रामपंचायतीचा सातारा येथे अभ्यास दौरा

The sarpanch was asked to take the route to the Nerul's waste | नेरळच्या कचऱ्यावर मार्ग काढण्यासाठी सरपंच सरसावल्या

नेरळच्या कचऱ्यावर मार्ग काढण्यासाठी सरपंच सरसावल्या

Next

नेरळ : नेरळ गावाची दिवसेंदिवस शहरीकरणाकडे वाटचाल सुरू आहे. मात्र, यासोबत नागरी प्रश्नही वाढत आहेत. या नागरी प्रश्नांमध्ये मुख्य प्रश्न आहे तो कचºयाचा! हा प्रश्न अनेक वर्षे भिजत घोंगडं म्हणून पडला होता. मात्र, नेरळच्या नव्या सरपंच जान्हवी साळुंके यांनी कचºयाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्याचा निश्चयच केला आहे. त्यासाठी नेरळ ग्रामपंचायतीच्या वतीने सातारा येथे अभ्यास दौरा नुकताच पार पडला आहे.

रायगड जिल्ह्यातील सगळ्यात मोठी ग्रामपंचायत असलेले शहर म्हणजे नेरळ. मध्य रेल्वेमुळे मुंबई उपनगराला नेरळ जोडले गेले आहे. मागील काही काळापासून येथे झपाट्याने सुरू असलेल्या बांधकाम व्यवसायामुळे शहरात अनेक ठिकाणी इमारतींचे जाळे निर्माण झाले. त्याचबरोबर येथील लोकसंख्याही वाढीस लागली. याबरोबर अनेक नागरी समस्या डोके वर काढू लागल्या. त्यातील मुख्य आणि नागरिकांना भेडसावणारी समस्या म्हणजे कचरा. सुमारे १८ हजारांच्या वर लोकसंख्या असलेल्या नेरळच्या लोकवस्तीच्या मध्यभागी असलेला कचरा डेपो अनेक वर्षे तसाच सुरू आहे. त्यावर गुरांची रेलचेल व भटक्या कुत्र्यांचे वास्तव्य कायम असते. अशातच या कचरा डेपोला आग लागण्याचे प्रमाण जास्त असल्याने बाजूने जाणारा कल्याण-कर्जत राज्यमार्गावरच्या वाहनचालकांना धुराच्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. तसेच येथे राहणाºया नागरिकांनाही आरोग्याच्या तक्रारी उद्भवत होत्या. त्यामुळे जिल्हा परिषदेने या ठिकाणी घनकचरा प्रकल्प करण्याचे ठरविले. मात्र, उद्घाटनाचे नारळ फोडून झाल्यावर तो प्रकल्प कागदावरच राहिला.

सरपंच जान्हवी साळुंके यांनी कचºयाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सर्वप्रथम कचरा डेपो नेरळच्या मध्यवर्ती ठिकाणाहून स्थलांतरित केला. तद्नंतर ग्रामपंचायतीमधील आपल्या सर्व सदस्य सहकाऱ्यांशी चर्चा करून यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या हालचाली सुरू केल्या. त्याचाच भाग म्हणून सातारा जिल्ह्णातील बनवाडी ग्रामपंचायत येथे अभ्यास दौरा आयोजित केला होता. या ठिकाणी या छोट्या ग्रामपंचायतीने कचºयाच्या समस्येवर मात करून गाव स्वच्छ व समृद्ध करून नवा आदर्श निर्माण केला. तेव्हा हा बनवाडी पॅटर्न नेरळमध्ये रुजवण्यासाठी नेरळच्या सरपंच जान्हवी साळुंके, उपसरपंच अंकुश शेळके, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र गुड्डे, सदस्य सदानंद निरगुडा, सुनील पारधी, आरोग्य कर्मचारी, पंचायत समिती कर्जतचे गटविकास अधिकारी बी. जी. पुरी, सहायक गटविकास अधिकारी धनराज राजपूत आदीसह हा दौरा पार पडला.

बनवाडी ग्रामपंचायतीने गावात कचºयापासून राबवलेले गांडूळखत प्रकल्प, सोलरवर पाणी योजना, संपूर्ण गाव डिजिटल अशा योजना खरेच कौतुकास्पद आहेत. नेरळमध्ये कचºयाच्या समस्येवर बनवाडी पॅटर्न राबविण्याचा आमचा विचार आहे. या अभ्यास दौºयानंतर त्यास पंचायत समिती, जिल्हा परिषद आदी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार चालना देण्याचा आमचा मानस आहे; पण शून्य कचरा संकल्पनेसाठी आम्ही आग्रही आहोत. -जान्हवी साळुंके, सरपंच, नेरळ ग्रामपंचायत

काय आहे बनवाडी पॅटर्न?
महाराष्ट्रातील सातारा या जिल्ह्यात बनवाडी ग्रामपंचायत आहे. शहरासारखे कचºयाचे ढीग या छोट्याशा गावातही होते. मात्र, या समस्येवर मात करण्याची जिद्द या ग्रामपंचतीने बाळगली.

कचरा ही एक समस्या न मानता ते आव्हान म्हणून स्वीकारले. लोकप्रबोधन व लोकसहभाग यातून ओला व सुका कचरा वेगळा करत, गांडूळ खताचा प्रकल्प चौदाव्या वित्त आयोगाचा निधी तो ही केवळ सव्वा लाख रुपये वापरत उभा केला.

सुरुवातीला २० गुंठे जमिनीत हा प्रकल्प या ग्रामपंचायतीने सुरू केला. बघता बघता शून्य कचरा ही संकल्पना गावात राबवत बनवाडी या पॅटर्न निर्माण केला. या प्रकल्पाकडे घाणीचा प्रकल्प म्हणून बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलण्याची गरज असल्याचे येथील ग्रामसेवक शिवाजी लाटे यांचे मत आहे.

Web Title: The sarpanch was asked to take the route to the Nerul's waste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.