प्रभाग रचनेसाठी सॅटेलाइटची मदत

By admin | Published: July 21, 2015 04:51 AM2015-07-21T04:51:05+5:302015-07-21T04:51:05+5:30

आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांची प्रभाग रचना करताना प्रथमच सॅटेलाइटची मदत घेतली जाणार आहे

Satellite support for ward structure | प्रभाग रचनेसाठी सॅटेलाइटची मदत

प्रभाग रचनेसाठी सॅटेलाइटची मदत

Next

आविष्कार देसाई, अलिबाग
आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांची प्रभाग रचना करताना प्रथमच सॅटेलाइटची मदत घेतली जाणार आहे. त्यामुळे अचूक सीमांकन करण्यास जिल्हा प्रशासनाला मदत मिळणार आहे. प्रभाग रचनेत सातत्याने होत असलेल्या राजकीय हस्तक्षेपाला त्यामुळे आळा बसेल.
ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर पालिका, राज्य आणि केंद्रातील सत्तेमध्ये आपल्याच पक्षाचे प्राबल्य राहावे यासाठी सर्वच राजकीय पक्ष वेगवेगळ््या मार्गाने प्रयत्नशील असतात. निवडणुकीत कपडे, साड्या, महागड्या वस्तू आणि अमाप पैसाही वाटला जातो. त्याचप्रमाणे ओल्या-सुक्या पार्ट्याही आयोजित करून मतदारांना आकर्षिक करण्याचा प्रयत्न करीत असतात. याच्याही पुढचा विचार करणारी राजकीय मंडळी राजकारणात आहेत. एखाद्या वॉर्ड अथवा प्रभागामध्ये विशिष्ट पक्षाचे प्राबल्य असणारे मतदार असतील, तर त्या मतदारांची नावे लगतच्या वॉर्ड अथवा प्रभागामध्ये फिरवली जातात. त्यामुळे सत्तेची समीकरणे बदलली जातात. अर्थात ही प्रक्रिया केवळ प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीशिवाय अशक्य आहे. यावर सर्व राजकीय डावपेचांना कुचकामी ठरविण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचना करताना सॅटेलाइटची मदत घेण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्य निवडणूक आयोगाने ४ आॅक्टोबर २०११ च्या अध्यादेशान्वये संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतचे काम लवकरच सुरु करावे, असे पत्र राज्य निवडणूक आयोगाने ७ जुलै २०१५ रोजी धाडले आहे. त्याची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाने सुरू केली असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांनी लोकमतशी बोलताना दिली.

Web Title: Satellite support for ward structure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.