श्रीवर्धन नगराध्यक्ष निवडणुकीत सातनाक विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 11:39 PM2020-09-25T23:39:09+5:302020-09-25T23:39:14+5:30
शिवसेनेचे अनंत गुरव पराभूत : राष्ट्रवादी काँग्रेसची नगरपरिषदेवर निर्विवाद सत्ता
लोकमत न्यूज नेटवर्क
श्रीवर्धन : श्रीवर्धन नगरपरिषद नगराध्यक्ष निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार जितेंद्र सातनाक विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेनेचे अनंत गुरव यांना पराभूत केले. जनतेमधून निवडून आलेले नगराध्यक्ष नरेंद्र भुसाणे गैरहजेरीच्या कारणास्तव अपात्र ठरल्याने नगराध्यक्ष निवडणूक घेण्यात आले. नरेंद्र भुसाणे यांच्या गैरहजेरी कालावधीमध्ये प्रभारी नगराध्यक्ष म्हणून जितेंद्र सातनाक यांनी काम केलेले आहे. निवडणूक अधिकारी सचिन गोसावी यांनी शुक्रवारी दुपारी मतमोजणीनुसार जितेंद्र सातनाक यांना १२ व अनंत गुरव यांना ५ असे मते मिळून जितेंद्र सातनाक विजयी झाले, असे
घोषित केले.
यावेळेस होणाऱ्या नगराध्यक्ष निवडणुकीसाठी जितेंद्र सातनाक व फैसल हूरजुक दोन्हीही राष्ट्रवादीचे नगरसेवक इच्छुक होते. त्या कारणास्तव पक्षांतर्गत मोठ्या स्वरूपात रस्सीखेच झाली आहे. खासदार सुनील तटकरे व विधानपरिषद आमदार अनिकेत तटकरे यांनी सुवर्णमध्य काढत जितेंद्र सातनाक यांना सहा महिने व फैसल हूरजुक यांना नऊ महिने नगराध्यक्षपदाची संधी देण्याचे ठरवले. त्यानुसार, मार्च, २०२१ पर्यंत जितेंद्र सातनाक नगराध्यक्षपदी कार्यरत राहतील. त्यानंतर, फैसल हूरजुक यांना नगराध्यक्षपदी संधी देण्यात येईल.
बहुमताने निवड
च्नगराध्यक्षपदाचे दुसरे इच्छुक उमेदवार फैसल हूरजुक हे मुस्लीम समाजातील उदयमुख नेतृत्व आहे. खा.सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार शेकाप, काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्या नगरसेवकांनी जितेंद्र सातनाक यांना बहुमताने निवडून दिले.