सावित्रीलाही प्रदूषणाचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 02:54 AM2018-04-09T02:54:22+5:302018-04-09T02:54:22+5:30

महाड औद्योगिक वसाहतीमधील सांडपाणी सावित्री खाडीत ओवळे येथे सोडले जात आहे. नदीपात्राला प्रदूषणाचा विळखा वाढू लागला असून अशीच स्थिती राहिली तर त्याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Savitri also detected pollution | सावित्रीलाही प्रदूषणाचा विळखा

सावित्रीलाही प्रदूषणाचा विळखा

Next

- सिकंदर अनवारे 
दासगाव : महाड औद्योगिक वसाहतीमधील सांडपाणी सावित्री खाडीत ओवळे येथे सोडले जात आहे. नदीपात्राला प्रदूषणाचा विळखा वाढू लागला असून अशीच स्थिती राहिली तर त्याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. शासकीय यंत्रणा प्रदूषण थांबविण्याकडे दुर्लक्ष करू लागल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरवात केली आहे.
महाड औद्योगिक वसाहत स्थापन झाल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रासायनिक कारखाने आले. या कारखान्यांतून बाहेर पडणारे सांडपाणी सुरवातीला कारखान्यांकडे सांडपाणी प्रक्रि या नसल्याने सोडून देण्याचे प्रकार उघड होत होते. कारखान्यांचे पाणी सोडल्याने महाडमधील सावित्री, काळ या नद्या प्रदूषित झाल्याच, शिवाय शेतीचे देखील मोठे नुकसान झाले. यामुळे शासनाने महाड औद्योगिक वसाहतीमध्ये सी.ई.टी.पी.ची निर्मिती केली.
या सांडपाणी प्रक्रि या केंद्रातून बाहेर पडणारे पाणी थेट आंबेत खाडीत तळाशी सोडण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र राजकीय दबावातून हे पाणी आंबेतपर्यंत गेलेच नाही यामुळे महाड औद्योगिक विकास महामंडळाने हे पाणी ओवळे गावाजवळ सावित्री नदीच्या किनाऱ्यालाच सोडण्यास सुरवात झाली. यामुळे भरतीच्यावेळी दूषित पाणी शेतात व पिण्याच्या पाण्याच्या जलस्रोतात जावू लागले. याबाबत या विभागातून स्थानिक ग्रामस्थांनी आवाज उठवल्यावर गेल्या वर्षी ओवळे येथून सव्वा दोन किमी आत खाडीत पाणी सोडण्याचे काम मंजूर करण्यात आले. मात्र हे काम आजही अपूर्णच असल्याने येथील सांडपाण्याची समस्या कायम राहिली आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने ओवळे येथून पाइपलाइनद्वारे हे सांडपाणी खाडीत मध्यभागी खोल सोडण्याकरिता काम हाती घेतले. याकरिता मुंबई येथील आशा अंडरवॉटर सर्विसेस या कंपनीने हा ठेका २0 टक्के कमी दराने घेतला. प्रत्यक्षात हे काम करताना सावित्री नदीत तळाशी उत्खनन करून पाइपलाइन टाकायची आहे. मात्र या ठेकेदाराने सुरवातीस काही अंतर जमिनीवरच काम केले. शासनाने या कामाकरिता ११ कोटी ६९ लाख रु पये मंजूर करून २१.१0 टक्के बिल ठेकेदाराला अदा करण्यात आले आहे. मात्र ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याने याबाबत स्थानिक ग्रामस्थांनी आक्षेप घेतल्याने हे काम बंद करण्यात आले. शिवाय या कामाला बंदर विकास मंडळाची देखील परवानगी संबंधित ठेकेदाराने घेतली नव्हती.
आजही हे काम ठप्प अवस्थेतच असून आलेली यंत्रणा आणि सामान धूळ खात पडून आहे. एक वर्षानंतर देखील संबंधित ठेकेदाराने हे काम
सुरु न केल्याने ओवळे
येथील सांडपाणी किनाºयालाच सोडले जात असल्याने सावित्रीच्या प्रदूषणाची समस्या आजही कायम राहिली आहे.
>आरोग्याचा प्रश्नही गंभीर
महाड औद्योगिक वसाहतीमध्ये आज देखील जवळपास १00 छोट्या-मोठ्या कंपन्या कार्यान्वित आहेत. हे सर्व कारखाने रासायनिक असल्याने यामधून घातक सांडपाणी बाहेर पडत असते.
या सांडपाण्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवाय शेतीचे देखील नुकसान झाले आहे. याचा विचार करूनच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने करोडो रु पये मंजूर करून हे काम हाती घेतले.
मात्र संबंधित ठेकेदाराने कमी दरात घेतलेले काम आणि महाड औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाºयांनी केलेले दुर्लक्ष यामुळे हे काम एक वर्षानंतर देखील प्रलंबित आहे.
यामुळे ओवळेतील सांडपाणी आजही सावित्रीजवळच सोडले जात आहे. यामुळे हे सांडपाणी ना आंबेतला गेले, ना ओवळेपासून दोन किमी आत. या रखडलेल्या कामाची चौकशी करून संबंधित अधिकाºयांना जबाबदार धरावे, अशी मागणी केली जात आहे.
>सामाईक सांडपाणी प्रक्रि या केंद्राचा दावा फोल
महाड औद्योगिक वसाहतीमधून खाडीत सोडले जाणारे पाणी हे प्रक्रि या करून सोडले जात असल्याचा दावा सामाईक सांडपाणी प्रक्रि या कायम करत आली आहे. प्रत्यक्षात मात्र ज्या ठिकाणी हे सांडपाणी सोडले जात आहे त्या ओवळे गावाजवळ कायम दुर्गंधीला तोंड द्यावे लागत आहे. शिवाय या ठिकाणी येणारे पाणी हे रंगीत आणि फेसाळणारे असल्याने खाडीचे पाणी आज देखील प्रदूषित होत आहे. यामुळे सामाईक सांडपाणी प्रक्रि या केंद्रातून सांडपाणी प्रक्रि या केल्याचा दावा फोल ठरत असल्याचे दिसून येत आहे.
ओवळे गावाजवळ सोडले जाणारे सांडपाणी सामाईक सांडपाणी प्रक्रि या केंद्रातून प्रक्रि या करूनच जाते. मात्र संबंधित पाइपलाइन ही जुनी झाली असल्या कारणाने महामंडळाने ही पाइपलाइन संपूर्णपणे बदलल्यास ही समस्या काही अंशी सुटण्याची शक्यता आहे.
- जी.पी.बोरु ले, प्रोसेस प्लांट सी.ई.टी.पी.
संबंधित ठेकेदाराने हे काम कमी दरात घेतले असले तरी ठरावीक वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे. मात्र सुरवातीला काही दिवस काम केल्यानंतर पुढील कामाला अद्याप त्यांनी सुरवात केलेली नाही.
- आर.बी.सूळ, उपकार्यकारी अभियंता एम.आय.डी.सी.

Web Title: Savitri also detected pollution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड