सावित्री-गांधारी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली, महाड शहराला पुराचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 01:32 AM2017-08-30T01:32:23+5:302017-08-30T01:32:28+5:30

गणेशाचे आगमन झाल्यापासून गेल्या पाच दिवसांपासून सुरू झालेली पावसाची रिपरिप अद्यापही कायम असून, गेल्या २४ तासांत कोसळणाºया मुसळधार पावसामुळे शहरानजीकहून वाहणाºया सावित्री आणि गांधारी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.

Savitri-Gandhari rivers cross the danger level, the danger of flooding of Mahad city | सावित्री-गांधारी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली, महाड शहराला पुराचा धोका

सावित्री-गांधारी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली, महाड शहराला पुराचा धोका

googlenewsNext

महाड : गणेशाचे आगमन झाल्यापासून गेल्या पाच दिवसांपासून सुरू झालेली पावसाची रिपरिप अद्यापही कायम असून, गेल्या २४ तासांत कोसळणाºया मुसळधार पावसामुळे शहरानजीकहून वाहणाºया सावित्री आणि गांधारी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे महाड शहराला पुराचा धोका निर्माण झाला असून, महामार्गावरून शहराकडे येणारा दस्तुरी मार्ग मंगळवारी दुपारी ४ वा. पाण्याखाली गेल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. तर शहराच्या सखल भागातही नद्यांचे पाणी शिरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ऐन गणेशोत्सवात पडणाºया या मुसळधार पावसामुळे तसेच पुराच्या शक्यतेने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर सततच्या पावसामुळे गणेशभक्तांच्या उत्साहावर अक्षरश: पाणी पडल्याचे दिसून येत आहे.
गेल्या २४ तासांत महाड तालुक्यात ११३.५० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शहरातील जनजीवन विस्कळीत झाले असून, ग्रामीण भागातील नागरिक शहरात न फिरकल्याने बाजारपेठेत वर्दळ कमी होती. तर ऐन गणेशोत्सवात गिºहाईक नसल्याने व्यापाºयांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. दस्तुरी मार्ग पाण्याखाली गेल्याने हा मार्ग दुपारनंतर वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर पुराचा धोका वाढण्याची भीती शहरवासीयांमध्ये व्यक्त के ली.


म्हसळा शहरात रस्त्यांवर साचले पाणी
म्हसळा : शहरात मागील दोन दिवस पडत असलेल्या पावसाने ठिकठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडत आहेत. विकासकांनी सर्व नियम धाब्यावर बसवून केलेली कामे, तसेच नगरपंचायतीने केलेल्या नालेसफाईचा दावा पूर्णपणे फोल ठरत असल्याने माणगाव-दिघी राज्यमार्ग, म्हसळे शहरात एस.टी. स्टॅण्ड परिसर व दिघी मार्ग पाण्याखाली गेला आहे. अरुंद गटारांमुळे पावसाच्या पाण्याचा तसेच सांडपाण्याचा निचरा रस्त्यावरून झाल्याने, या रस्त्याला नदीचे स्वरूप आले आहे. या रस्त्यालगत म्हसळा महावितरणचे कार्यालय असून, येथे एक फुटाच्या वर पाणी साचले आहे. म्हसळ्याकडून दिवेआगर, दिघीकडे जाणारा हा प्रमुख व एकमेव राज्यमार्ग आहे. हा रस्ता पाण्याखाली असल्यामुळे वाहनचालक व प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय.
गौरीचे आगमन होणार असल्याने बाजार करण्यासाठी आसपासच्या गावांतील नागरिक मोठ्या संख्येने येत आहेत, त्यातच शहरातील रस्ता पाण्याखाली गेल्याने ठिकठिकाणी मोठे अपघाती खड्डे पडले असून, दुचाकीस्वार येथे पडण्याच्या घटना रोज होत आहेत. या रस्त्याच्या दुरवस्थेकडे कोणीही पाहत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
म्हसळे शहरातून जाणारा हा राज्यमार्ग दिवेआगर पर्यटनस्थळ, तसेच दिघी पोर्टला जाणारा एकमेव मार्ग असल्याने या मार्गावरून प्रवासी वाहनांसोबत पर्यटकांची वाहने व दिघी पोर्टकडून होणारी ओव्हरलोड वाहतूक प्रामुख्याने ३५ टन वजनाची लोखंडी कॉइल व कोळसावाहतूक कारणीभूत असल्याने रस्त्यावरील खड्ड्यांच्या प्रमाणात वाढ होऊन रस्त्यावर खडी पसरली आहे व त्यातच रस्त्यावर पाणी साचल्याने नागरिक, प्रवाशांची तारांबळ उडाली झाली आहे.

अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत
पनवेल : गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेली पावसाची संततधार मंगळवारी वाढल्याने पनवेलमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मंगळवारी पावसाचा जोर वाढल्याने रेल्वेसेवाही ठप्प होती. पनवेल शहरातून जाणाºया सायन-पनवेल, मुंबई-गोवा महामार्गावर काही ठिकाणी पाणी साचले होते. दोन दिवसांत पनवेलमध्ये शंभर मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद करण्यात आली. रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने पुढील २४ तासांत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
पनवेल आयटीआयसमोर सोमवारी झाड पडल्याने काही काळ रस्ता बंद झाला होता. पनवेलमधील गाढी नदी दुथडी भरून वाहत होती. विशेष म्हणजे, मंगळवारी गौरीचे आगमन असल्याने अनेक जण खरेदीसाठी बाहेर पडले होते. मात्र, मुसळधार पावसाने अनेकांच्या खरेदीवर याचा परिणाम झाला. मुंबईला जाणाºया लोकल सेवा ठप्प झाल्याने अनेकांना महामंडळाच्या बसेसवर व खासगी गाड्यांवर अवलंबून राहावे लागले होते. मात्र, रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीचा वेगही मंदावला होता. सायंकाळी उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता.
मुंबई-गोवा महामार्गावर गणेशोत्सवाच्या काळात वाहनांची वर्दळ मोठी असते. मात्र, ठिकठिकाणी पाणी साचल्याने ही वाहतूक संथ झाली आहे. सायन-पनवेल महामार्गावर खारघर टोलनाका परिसर व कळंबोली बस स्थानकाजवळ पाणी साचले होते.

Web Title: Savitri-Gandhari rivers cross the danger level, the danger of flooding of Mahad city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.