शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

सावित्री-गांधारी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली, महाड शहराला पुराचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 1:32 AM

गणेशाचे आगमन झाल्यापासून गेल्या पाच दिवसांपासून सुरू झालेली पावसाची रिपरिप अद्यापही कायम असून, गेल्या २४ तासांत कोसळणाºया मुसळधार पावसामुळे शहरानजीकहून वाहणाºया सावित्री आणि गांधारी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.

महाड : गणेशाचे आगमन झाल्यापासून गेल्या पाच दिवसांपासून सुरू झालेली पावसाची रिपरिप अद्यापही कायम असून, गेल्या २४ तासांत कोसळणाºया मुसळधार पावसामुळे शहरानजीकहून वाहणाºया सावित्री आणि गांधारी नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे महाड शहराला पुराचा धोका निर्माण झाला असून, महामार्गावरून शहराकडे येणारा दस्तुरी मार्ग मंगळवारी दुपारी ४ वा. पाण्याखाली गेल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद झाला आहे. तर शहराच्या सखल भागातही नद्यांचे पाणी शिरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ऐन गणेशोत्सवात पडणाºया या मुसळधार पावसामुळे तसेच पुराच्या शक्यतेने शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर सततच्या पावसामुळे गणेशभक्तांच्या उत्साहावर अक्षरश: पाणी पडल्याचे दिसून येत आहे.गेल्या २४ तासांत महाड तालुक्यात ११३.५० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शहरातील जनजीवन विस्कळीत झाले असून, ग्रामीण भागातील नागरिक शहरात न फिरकल्याने बाजारपेठेत वर्दळ कमी होती. तर ऐन गणेशोत्सवात गिºहाईक नसल्याने व्यापाºयांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. दस्तुरी मार्ग पाण्याखाली गेल्याने हा मार्ग दुपारनंतर वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर पुराचा धोका वाढण्याची भीती शहरवासीयांमध्ये व्यक्त के ली.म्हसळा शहरात रस्त्यांवर साचले पाणीम्हसळा : शहरात मागील दोन दिवस पडत असलेल्या पावसाने ठिकठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडत आहेत. विकासकांनी सर्व नियम धाब्यावर बसवून केलेली कामे, तसेच नगरपंचायतीने केलेल्या नालेसफाईचा दावा पूर्णपणे फोल ठरत असल्याने माणगाव-दिघी राज्यमार्ग, म्हसळे शहरात एस.टी. स्टॅण्ड परिसर व दिघी मार्ग पाण्याखाली गेला आहे. अरुंद गटारांमुळे पावसाच्या पाण्याचा तसेच सांडपाण्याचा निचरा रस्त्यावरून झाल्याने, या रस्त्याला नदीचे स्वरूप आले आहे. या रस्त्यालगत म्हसळा महावितरणचे कार्यालय असून, येथे एक फुटाच्या वर पाणी साचले आहे. म्हसळ्याकडून दिवेआगर, दिघीकडे जाणारा हा प्रमुख व एकमेव राज्यमार्ग आहे. हा रस्ता पाण्याखाली असल्यामुळे वाहनचालक व प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय.गौरीचे आगमन होणार असल्याने बाजार करण्यासाठी आसपासच्या गावांतील नागरिक मोठ्या संख्येने येत आहेत, त्यातच शहरातील रस्ता पाण्याखाली गेल्याने ठिकठिकाणी मोठे अपघाती खड्डे पडले असून, दुचाकीस्वार येथे पडण्याच्या घटना रोज होत आहेत. या रस्त्याच्या दुरवस्थेकडे कोणीही पाहत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.म्हसळे शहरातून जाणारा हा राज्यमार्ग दिवेआगर पर्यटनस्थळ, तसेच दिघी पोर्टला जाणारा एकमेव मार्ग असल्याने या मार्गावरून प्रवासी वाहनांसोबत पर्यटकांची वाहने व दिघी पोर्टकडून होणारी ओव्हरलोड वाहतूक प्रामुख्याने ३५ टन वजनाची लोखंडी कॉइल व कोळसावाहतूक कारणीभूत असल्याने रस्त्यावरील खड्ड्यांच्या प्रमाणात वाढ होऊन रस्त्यावर खडी पसरली आहे व त्यातच रस्त्यावर पाणी साचल्याने नागरिक, प्रवाशांची तारांबळ उडाली झाली आहे.अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीतपनवेल : गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेली पावसाची संततधार मंगळवारी वाढल्याने पनवेलमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मंगळवारी पावसाचा जोर वाढल्याने रेल्वेसेवाही ठप्प होती. पनवेल शहरातून जाणाºया सायन-पनवेल, मुंबई-गोवा महामार्गावर काही ठिकाणी पाणी साचले होते. दोन दिवसांत पनवेलमध्ये शंभर मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद करण्यात आली. रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने पुढील २४ तासांत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.पनवेल आयटीआयसमोर सोमवारी झाड पडल्याने काही काळ रस्ता बंद झाला होता. पनवेलमधील गाढी नदी दुथडी भरून वाहत होती. विशेष म्हणजे, मंगळवारी गौरीचे आगमन असल्याने अनेक जण खरेदीसाठी बाहेर पडले होते. मात्र, मुसळधार पावसाने अनेकांच्या खरेदीवर याचा परिणाम झाला. मुंबईला जाणाºया लोकल सेवा ठप्प झाल्याने अनेकांना महामंडळाच्या बसेसवर व खासगी गाड्यांवर अवलंबून राहावे लागले होते. मात्र, रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीचा वेगही मंदावला होता. सायंकाळी उशिरापर्यंत पावसाचा जोर कायम होता.मुंबई-गोवा महामार्गावर गणेशोत्सवाच्या काळात वाहनांची वर्दळ मोठी असते. मात्र, ठिकठिकाणी पाणी साचल्याने ही वाहतूक संथ झाली आहे. सायन-पनवेल महामार्गावर खारघर टोलनाका परिसर व कळंबोली बस स्थानकाजवळ पाणी साचले होते.