सावंत पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व कायम
By admin | Published: January 12, 2016 12:53 AM2016-01-12T00:53:04+5:302016-01-12T00:53:04+5:30
संपूर्ण कोकणात अग्रगण्य सहकारी बँक म्हणून लोकप्रिय असलेल्या दी अण्णासाहेब सावंत को-आॅपरेटिव्ह अर्बन बँकेच्या रविवारी झालेल्या निवडणुकीत विद्यमान चेअरमन शोभा सावंत यांच्या
महाड : संपूर्ण कोकणात अग्रगण्य सहकारी बँक म्हणून लोकप्रिय असलेल्या दी अण्णासाहेब सावंत को-आॅपरेटिव्ह अर्बन बँकेच्या रविवारी झालेल्या निवडणुकीत विद्यमान चेअरमन शोभा सावंत यांच्या नेतृत्वाखालील सावंत पॅनेलचे सर्व आठ उमेदवार विजयी झाले. रविवारी पार पडलेल्या निवडणुकीत २८ टक्के मतदान झाले होते.
सावंत पॅनेलचे विजयी उमेदवार - शहाजी देशमुख (४१२० मते), चंद्रहास मिरगल (४२५६), महेंद्र पाटेकर (४२२५), प्रवीण पटेल (४०३१), समीर सावंत (३८९७), मिता शेठ (४०९९), सुहास तलाठी (३९४०), अॅड. नीलिमा वर्तक (३६४६) या निवडणुकीत अविकुमार धुरी (१५४४) व भाजपा नेते शेखर ताडफळे (८२१) हे दोघेही विरोधी उमेदवार पराभूत झाले. यंदा बिनविरोध निवडणुकीची परंपरा खंडित झाली. तब्बल वीस वर्षांनंतर बँकेच्या सभासदांना मतदानाची संधी प्राप्त झाली होती.
सोमवारी सकाळी ९.३० वा. डॉ. आंबेडकर सभागृहात मतमोजणीला प्रारंभ झाला. दुपारी १ वाजता मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर निवडणूक निर्णयअधिकारी सुरेश पाचंगे यांनी निकाल घोषित करताच सावंत समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला. निवडणुकीपूर्वी सावंत पॅनेलचे ७ संचालक बिनविरोध निवडून आले. ४० वर्षांपासूनचे वर्चस्व यावेळीही सावंत पॅनेलने कायम ठेवले आहे. (वार्ताहर)