कोरोनामुळे हरवला फु लांचा सुगंध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 12:54 AM2020-07-27T00:54:04+5:302020-07-27T00:54:07+5:30

विक्रे त्यांना आर्थिक तोटा : श्रावण महिना सुरू होऊनही मागणी नसल्याने वाढली चिंता

The scent of flower lost due to corona | कोरोनामुळे हरवला फु लांचा सुगंध

कोरोनामुळे हरवला फु लांचा सुगंध

Next


गणेश चोडणेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
आगरदांडा : मार्च महिन्यापासून संचारबंदी लागू केल्याने व वाहतुकीची सर्व मार्ग बंद केल्यामुळे लोकांचे येणे- जाणे थांबले व वाहतूक व्यवस्था ठप्प झाल्याने सर्व आर्थिक व्यवहारांना मोठा फटका बसला, जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीशिवाय अन्य कोणत्याही वाहतुकीला परवानगी नसल्याने इतर घटकाची मोठी कोंडी झाली. विवाह व पूजा समारंभासाठी आवश्यक म्हणजे फुलांना खूप मोठे महत्त्व असते. त्यात श्रावण महिना सुरू झाला, तरी फु लांना मागणी नसल्याने विक्रेते काळजीत आहेत.
कोरोनाच्या संचारबंदीमुळे मंदिरे, विवाह सोहळ्यांवरही बंधने आली असल्याने बाजारपेठेतील फुलांचा सुगंध हरवला आहे. श्रावण महिना व्रतवैकल्यांचा महिना असल्याने सुगंधी फुलांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. त्यानुसार, येथील फुलविक्रेते वाशी, पेण, दादर या मंडई बाजारातून फुले आणून ती मुरुड बाजारात विकतात. सध्या मुरुड तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे श्रावण महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात फूल विक्रेत्यांना ग्राहकांची प्रतीक्षा करावी लागत आहे. फुलाचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांनीही नेमकेच उत्पादन केल्यामुळे बाजारात फुले नेमकीच येत आहेत. मागणीही कमी झाल्याने याचा परिणाम फुलांच्या किमती वाढण्यावर झाला आहे. ग्राहकांची संख्या रोडावली, सत्कार समारंभ बंद यामुळे एके काळी दहा हजारांचा गल्ला करणारे फुल विक्रेत्यांना आता फार तुटपुंज्या धंद्यावर समाधान मानावे लागत आहे. कोरोनाच्या संकटामुळे स्थानिक फूल उत्पादकांनी यावेळी फुलांचे उत्पादन घेणेही टाळल्याने तेही आर्थिक संकटात सापडले आहेत. यंदा फुलांची मागणी घटल्यामुळे मिळेल त्या दरात फुलांची विक्री उत्पादकांसह विक्रेत्यांना करावी लागत आहे.
वाहतूक सुरळीत नसल्याने उत्पन्न कमी
सहज वाहतूक होत नसल्याने उत्पादित केलेली फुले मंडईपर्यंत पोहोचवता येत नाही, त्यामुळे फुलांचे भरमसाट उत्पादन न करणेच योग्य आहे. सर्व वाहतूक सुरू झाल्यास फुलांचे मोठ्या प्रमाणवर उत्पादन करू, अशी प्रतिक्रिया दिली आहे. ऐन श्रावण मासात फुलांना वाढती मागणी असताना, ती प्रचंड प्रमाणात घटल्याने फुलांचे उत्पादन करणारे शेतकरी व फूल विक्रेते हे नाराज दिसून येत आहेत.

अनेक वर्ष फुलांचा व्यवसाय करून या व्यवसायातूनच उपजिविका चालवत आलो आहे. परंतु यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे हा व्यवसाय धुळीस मिळाला. कोरोना संकट कमी व्हावा त्याकरिता सरकारने लॉकडाऊन जाहिर केल्याने लग्नसराई , मंदिरे , धामार्कि उत्सव बंद झाले. आता सरकारने लॉकडाऊन शिथिल केल्याने पुन्हा आम्ही व्यवसाय सुरू केला. मात्र, फुलमंडईत फुलांची अवक कमी झाल्याने दरात वाढ झाल्याने ग्राहक कमी झाला आहे. परिणामी खरेदी केलेली फुले खराब होत असल्याने आर्थिक नुकसान होत आहे.
- राजेश मुळेकर, फु ल विक्रे ते

Web Title: The scent of flower lost due to corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.