पनवेल महापालिका हद्दीतील शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर, अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2024 10:05 PM2024-07-08T22:05:30+5:302024-07-08T22:08:31+5:30

रायगड जिल्हयामध्ये सद्यस्थितीमध्ये असलेल्या परिस्थितीमुळे घेतला निर्णय

Schools in Panvel Municipal Corporation have been declared holiday on Tuesday, Municipal Commissioner's decision | पनवेल महापालिका हद्दीतील शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर, अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे निर्णय

पनवेल महापालिका हद्दीतील शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर, अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे निर्णय

Panvel School Closed: पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व सरकारी, खाजगी व्यवस्थापनाच्या, माध्यमाच्या शाळा, सर्व महाविद्यालये, सर्व आश्रमशाळा, व्यवसाय, प्रशिक्षण केंद्र यांना दिनांक ९ जुलै २०२४ रोजी सुट्टी जाहिर करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यात उद्भवणा-या विविध नैसर्गिक आपत्ती संदर्भात प्रतिबंध, निवारण, पुर्वतयारी, प्रतिसाद, मदत व पुर्नवसन इ. बाबी सुव्यवस्थितपणे हाताळण्यासाठी केंद्र शासनाने आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अंमलात आणला आहे. रायगड जिल्हयामध्ये सद्यस्थितीमध्ये अतिवृष्टी होत असून तसेच भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार दिनांक ९ जुलैला रायगड जिल्हयाला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. याबाबींचा विचार करता पनवेल महानगरपालिका हद्दीतील सर्व शाळा व महाविद्यालयांना ९ जुलैला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

नवी मुंबई, ठाणे जिल्ह्यातील शाळांना मंगळवारी सुट्टी जाहीर; मुसळधार पावसामुळे घेतला निर्णय

पनवेल महापालिकेच्या हद्दीतील सर्व सरकारी, खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये व आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था यांना ९ जुलै २०२४ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली असून आदेशाची सर्व संबंधितांनी तात्काळ अंमलबजावणी करावी, असे आदेश पनवेल महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांनी दिले आहेत.

Web Title: Schools in Panvel Municipal Corporation have been declared holiday on Tuesday, Municipal Commissioner's decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.