शहरं
Join us  
Trending Stories
1
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
2
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
5
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
6
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
7
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
8
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
9
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
10
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
12
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
13
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
14
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
15
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
16
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
18
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
19
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
20
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान

टंचाईचा कृती आराखडा मंजूर

By admin | Published: March 09, 2017 2:32 AM

रायगड जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत सरासरी एक हजार ८१३ मिलीमीटर पाऊस जास्त पडला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाई कृती आराखड्यात तब्बल एक कोटी

- आविष्कार देसाई, अलिबाग

रायगड जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत सरासरी एक हजार ८१३ मिलीमीटर पाऊस जास्त पडला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाई कृती आराखड्यात तब्बल एक कोटी ६५ लाख रुपयांनी घट झाली आहे. चिंतेची बाब म्हणजे कमी कालावधीत अधिक पाऊस पडल्याने तो भूगर्भात मुरण्याचे प्रमाण कमी असल्याने संभाव्य ठिकाणी पाणीटंचाई जाणवणार आहे. त्यावर मात करण्यासाठी सहा कोटी २५ लाख रुपयांच्या टंचाई कृती आराखड्याला जिल्हा प्रशासनाने मंजुरी दिली आहे.२०१६-१७ या कालावधीमध्ये तीन हजार ७७७ मि.मी. पाऊस पडला, तर २०१५ मध्ये पर्जन्यमान सरासरी एक हजार ९६४ मि.मी. होते. याची तुलना केली असता जिल्ह्यातील पनवेल, कर्जत आणि खालापूर हे तीन तालुके वगळता अन्य तालुक्यांमध्ये पर्जन्यमानामध्ये १० ते ५५ टक्क्यांची वाढ दिसून येते. अलिबाग, पेण, उरण, मुरुड, माणगाव, रोहे, सुधागड-पाली, महाड, पोलादपूर, श्रीवर्धन, म्हसळा, तळा, पनवेल, कर्जत आणि खालापूर तालुक्यांमध्ये दोन ते १० टक्क्यांची घट दिसून येते. जिल्ह्यामध्ये कमी कालावधीत जास्त पाऊस पडल्याने पावसाने सुखद धक्का दिला; परंतु भूगर्भामध्ये पाणी मुरण्याला कमी कालावधी मिळाला. पाणलोट क्षेत्रनिहाय निश्चित केलेल्या निरीक्षण विहिरींच्या पातळीमध्ये पर्जन्यमान जास्त होऊन देखील विशेष वाढ झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे डोंगराळ भाग, उतार परिसराचा भाग, जमिनीत असणाऱ्या खडकांचा भाग आणि खारेपाट विभागात पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता प्रशासनाने गृहीत धरली आहे. यासाठी सहा कोटी २५ लाख रुपयांचा टंचाईकृती आराखडा मंजूर करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात आॅक्टोबर १६ ते डिसेंबर १६ या कालावधीत पाणीटंचाई भासणार नसल्याचे प्रशासनाने गृहीत धरले होते. या कालावधी पाणीटंचाई न भासल्याने खर्चाची तरतूद करण्यात आलेली नाही.जानेवारी १७ ते मार्च १७ या दुसऱ्या टप्प्यामध्ये पाण्याची टंचाई जाणवणार असल्याने दोन कोटी ५० लाख रुपये, तर एप्रिल १७ ते जून १७ या तिसऱ्या टप्प्यासाठी तीन कोटी ७५ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत.जिल्ह्यातील ३६७ गावे एक हजार १०९ वाड्या अशा एकूण एक हजार ४७६ ठिकाणी टँकर, बैलगाडीने पाणीपुरवठा तसेच विंधण विहिरींसाठी सहा कोटी २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पोलादपूर, महाड, श्रीवर्धन, पनवेल, पेण तालुक्यात टंचाई जास्त प्रमाणात जाणवणार आहे.गेल्या वर्षी कमी पाऊसगेल्या वर्षी पाऊस कमी पडल्याने टंचाई कृती आराखडा हा सात कोटी ८८ लाख रुपयांचा होता. २९२ गावे, ९२६ वाड्या अशा एकूण एक हजार २९८ ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता. १४० गावे, ४३७ वाड्यांमध्ये ५७७ विंधण विहिरी खोदण्यात आल्या होत्या, तर नळ पाणीपुरवठा विशेष दुरुस्तीसाठी एक गाव, ६९ वाड्या अशा एकूण ७०, तर तात्पुरत्या नळ पाणीपुरवठा योजनेसाठी एका वाडीचा समावेश होता. अशा एकत्रित ४३३ गावे, एक हजार ४४३ वाड्यांचा समावेश कृती आराखड्यात करण्यात आला होता. पैकी ७२ गावे आणि ३६४ वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता. त्यासाठी पाच कोटी ७ लाख रुपयांचा खर्च आला होता. त्याचप्रमाणे ४३ गावे आणि १३४ वाड्यांमध्ये १७७ विंधण विहिरी खोदण्यात आल्या. त्यासाठी अंदाजित सुमारे चार कोटी रुपये प्रशासनाने खर्ची टाकले आहेत.आॅक्टोबर १६ ते डिसेंबर १६ पहिला टप्पाखर्चाची तरतूद नाहीजानेवारी १७ ते मार्च १७ दुसरा टप्पा०२ कोटी ५० लाख रुपयेएप्रिल १७ ते जून १७ तिसऱ्या टप्पा०३ कोटी ७५ लाख रुपये - जिल्ह्यातील ३६७ गावे एक हजार १०९ वाड्या अशा एकूण एक हजार ४७६ ठिकाणी टँकर, बैलगाडीने पाणीपुरवठा तसेच विंधण विहिरींसाठी सहा कोटी २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. - पोलादपूर, महाड, श्रीवर्धन, पनवेल, पेण तालुक्यांत टंचाई जास्त प्रमाणात जाणवणार आहे.