पनवेल : पनवेल तालुक्यात दसºयाच्या मुहूर्तावर ९०० पेक्षा जास्त दुचाकी गाड्यांची विविध शोरुम्सच्या मार्फत विक्री करण्यात आली, तर जवळजवळ ६५० पेक्षा जास्त चारचाकी वाहने एकट्या पनवेलमधून खरेदी करण्यात आली. शिवाय, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, फ्रीज, टीव्ही आदींसह विविध इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी करण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडाली होती. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध दुकाने, मॉल्समधून खरेदीवर विशेष सूट देण्यात आली.दसºयाच्या सणात झेंडूच्या फुलांचे महत्त्व वेगळे आहे, त्यानुसार शहरातील पदपथावर झेंडूच्या विक्रेत्यांनी बुधवार सकाळपासूनच बस्तान ठोकले होते. दसºयाच्या मुहूर्तावर गुरुवारी झेंडूची फुले व तोरण खरेदी करण्यासाठी पनवेलकरांनी एकच गर्दी केल्याचे दिसून आले.रायगड जिल्हा पोलीस दलाचे शस्त्रपूजनअलिबाग : पोलीस दलात विजयादशमीच्या दिवशीच्या शस्त्रपूजनास अनन्यसाधारण महत्त्व असते. यंदा रायगड जिल्हा पोलीस मुख्यालयातील शस्त्रागारात रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर आणि अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांच्या हस्ते सकाळी शस्त्रपूजन करण्यात आले. या वेळी अलिबाग उपविभागीय पोलीस अधिकारी दत्तात्रेय निघोट, राखीव पोलीस निरीक्षक आर.बी. शेंडे तसेच अन्य पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दसऱ्याच्या मुहूर्तावर खरेदीसाठी झुंबड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 11:34 PM