शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
5
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
6
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
7
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
8
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
9
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
10
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
11
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
13
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
14
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
15
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
16
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
17
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
18
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

समुद्रकिनारी ४० कोटींचे बंधारे

By admin | Published: November 18, 2015 12:50 AM

श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर समुद्र किनारी सुमारे ४० कोटी रुपये खर्चून दगडी बंधारा बांधण्याचे काम पतन विभागामार्फत लवकरच हाती घेण्यात येणार आहे. समुद्राचे पाणी अडविण्यासाठी

- आविष्कार देसाई,  अलिबागश्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर समुद्र किनारी सुमारे ४० कोटी रुपये खर्चून दगडी बंधारा बांधण्याचे काम पतन विभागामार्फत लवकरच हाती घेण्यात येणार आहे. समुद्राचे पाणी अडविण्यासाठी तसेच पर्यटकांच्या सुविधेसाठीही त्याचा वापर करता येणार आहे. दिवेआगर हे सांसद आदर्श ग्राम म्हणून गणले जात असतानाच पर्यटन वृध्दीने तालुक्याचा आर्थिक कायापालट करण्यास हे बंधारे मैलाचे दगड ठरण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्याला लाभलेले विस्तृत समुद्र किनारे आणि तेथील नारळी-पोफळीच्या बागांनी निसर्गाचे सौंदर्य आणखीन खुलून दिसते. अलिबाग, मुरुड आणि श्रीवर्धन तालुक्याला विस्तृत समुद्र किनारे लाभले असल्याने पर्यटकांना नेहमीच ते आकर्षित करीत आले आहेत.तत्कालीन पालकमंत्री सुनील तटकरे यांनी दिवेआगरच्या रूपनारायण मंदिराला नवे रूप दिले होते. त्याचप्रमाणे श्रीवर्धन समुद्र किनारी कोट्यवधी रुपये खर्च करून सुशोभीकरण केले आहे. या सोयी-सुविधांमुळे येथील पर्यटन व्यवसायाला चांगलीच झळाळी प्राप्त झाली. अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी लोकसभेच्या निवडणुकीत तटकरेंचा पराभव केला होता. दिवेआगर हे गाव आदर्श सांसद ग्राम योजनेअंतर्गत दत्तक घेतले आहे. त्यामुळे तटकरेंनी विकास केला त्याहीपेक्षा जास्त विकास करण्यावर गीतेंचा भर राहिल्यास तो स्थानिकांच्या पथ्यावर पडणाराच आहे. ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर गीतेंनी दिवेआगरच्या समुद्र किनारी भेट दिली होती. त्यावेळी तेथील काही दगडी बंधारे तुटलेले, सरकलेले दिसून आले. या बंधाऱ्यांची तातडीने चांगली निर्मिती करावी यासाठी प्रयत्न सुरु केले. पतन विभागाने येथील समुद्र किनाऱ्यांची पाहणी केली. सुमारे चार किलोमीटरचे बंधारे निर्माण करण्याची गरज असल्याचा अहवाल पतन विभागाने दिला. यासाठी ४० कोटी रुपये खर्च येणार आहे.समुद्र किनाऱ्यांच्या बंधाऱ्याचे काम पूर्वी पतन विभाग करीत होते. दरम्यानच्या कालावधीत १ एप्रिल २०११ ला हे काम मेरीटाईम बोर्डाकडे देण्यात आले होते. सरकारने २५ मे २०१५ ला हे काम पुन्हा पतन विभागाकडे वर्ग करण्याचे जाहीर केल्याचे पतन उपअभियंता विजय जावीर यांनी सांगितले.१० कोटी रुपये खर्च पहिल्या टप्प्यामध्ये दिवेआगर येथील एक हजार २५० मीटरचा बंधारा बांधण्यासाठी १० कोटी रुपये खर्च येणार आहे. उर्वरित कामासाठी आणखीन ३० कोटी रुपयांची गरज लागणार असल्याचे पतन उपअभियंता विजय जावीर यांनी सांगितले.निधीची तरतूद लवकर गरजेचीयेथील बंधारे लवकरच निर्माण झाल्याने समुद्राच्या पाण्यापासून संरक्षण होऊन ते बंधारे पर्यटकांच्या सुविधेसाठीही वापरता येणार आहेत. यासाठी सरकारने निधीची तरतूद लवकर करणे गरजेचे असल्याचे येथील स्थानिक सिध्देश शिलकर यांनी सांगितले.सरकारकडे निधीची कमतरता असल्याने बंधाऱ्याचे काम टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहे. बंधाऱ्यांमुळे समुद्राचे पाणी अडविले जाणार आहेच तसेच त्या बंधाऱ्यांचा पर्यटकांनाही वापर करता येणार आहे. त्यामुळे पर्यटन वृध्दीसाठी ते पोषक आहे.- अनंत गीते, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री