सेझ प्रकल्पांतर्गत दुसऱ्या टप्प्यातील भूखंडाचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 05:16 AM2018-10-22T05:16:08+5:302018-10-22T05:16:10+5:30

नौकानयन मंत्रालयाच्या अखत्यारीत येणा-या सागरमाला उपक्रमांंतर्गत जेएनपीटी सेझतर्फे २७७ हेक्टर जमिनीवर मालकी हक्क मिळवून बहुउद्देशीय सेझ उभारण्यात येत आहे.

Second phase plot allocated under SEZ project | सेझ प्रकल्पांतर्गत दुसऱ्या टप्प्यातील भूखंडाचे वाटप

सेझ प्रकल्पांतर्गत दुसऱ्या टप्प्यातील भूखंडाचे वाटप

Next

उरण (रायगड) : नौकानयन मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाºया सागरमाला उपक्रमांंतर्गत जेएनपीटी सेझतर्फे २७७ हेक्टर जमिनीवर मालकी हक्क मिळवून बहुउद्देशीय सेझ उभारण्यात येत आहे. यातील यशस्वी लिलावधारकांना रस्ते वाहतूक नौकानयन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शनिवारी दुसºया टप्प्यातील भूखंड वाटपाचे प्रमाणपत्र देण्यात आले.
जेएनपीटी सेझ उत्तम प्रगती करीत आहे. परकीय गुंतवणूकदार त्यांची उत्पादन निर्मिती जेएनपीटी सेझ येथे सुरू करण्यास उत्सुक आहेत. मेकिंग इंडियाला औद्योगिक क्षेत्र म्हणून प्रस्थापित करणे हे मुख्य ध्येय असून जेएनपीटी सेझ आपल्या दीर्घ प्रवासात हे ध्येय पूर्णत्वास नेईल, असा विश्वास या वेळी नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. भाडेतत्त्वावर विकासासाठी दिल्या जाणाºया ४५० एकरपैकी ७५ एकर जमिनीचे वाटप १६ यशस्वी लिलावधारकांना करण्यात आले आहे. तीन निविदांच्या माध्यमातून ६३० कोटी रुपये जेएनपीटीला मिळाले आहेत.
>चार हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये या प्रकल्पाची पायाभरणी केली. सेझअंतर्गत ३५ टक्के ईपीसी काम प्रगतिपथावर असून, जुलै २०१९ पर्यंत ते पूर्ण होणे अपेक्षित आहे. पुढील दोन वर्षात चार हजार प्रत्यक्ष रोजगार निर्मिती अपेक्षित असून २५ हजार नोकºया निर्माण करण्याची क्षमता आहे. तसेच पुढील दोन वर्षात ४५० कोटींची गुंतवणूक अपेक्षित असून, पूर्ण सेझच्या माध्यमातून चार हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे.

Web Title: Second phase plot allocated under SEZ project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.