शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

सेझ प्रकल्पांतर्गत दुसऱ्या टप्प्यातील भूखंडाचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2018 5:16 AM

नौकानयन मंत्रालयाच्या अखत्यारीत येणा-या सागरमाला उपक्रमांंतर्गत जेएनपीटी सेझतर्फे २७७ हेक्टर जमिनीवर मालकी हक्क मिळवून बहुउद्देशीय सेझ उभारण्यात येत आहे.

उरण (रायगड) : नौकानयन मंत्रालयाच्या अखत्यारीत येणाºया सागरमाला उपक्रमांंतर्गत जेएनपीटी सेझतर्फे २७७ हेक्टर जमिनीवर मालकी हक्क मिळवून बहुउद्देशीय सेझ उभारण्यात येत आहे. यातील यशस्वी लिलावधारकांना रस्ते वाहतूक नौकानयन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शनिवारी दुसºया टप्प्यातील भूखंड वाटपाचे प्रमाणपत्र देण्यात आले.जेएनपीटी सेझ उत्तम प्रगती करीत आहे. परकीय गुंतवणूकदार त्यांची उत्पादन निर्मिती जेएनपीटी सेझ येथे सुरू करण्यास उत्सुक आहेत. मेकिंग इंडियाला औद्योगिक क्षेत्र म्हणून प्रस्थापित करणे हे मुख्य ध्येय असून जेएनपीटी सेझ आपल्या दीर्घ प्रवासात हे ध्येय पूर्णत्वास नेईल, असा विश्वास या वेळी नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. भाडेतत्त्वावर विकासासाठी दिल्या जाणाºया ४५० एकरपैकी ७५ एकर जमिनीचे वाटप १६ यशस्वी लिलावधारकांना करण्यात आले आहे. तीन निविदांच्या माध्यमातून ६३० कोटी रुपये जेएनपीटीला मिळाले आहेत.>चार हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षितपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये या प्रकल्पाची पायाभरणी केली. सेझअंतर्गत ३५ टक्के ईपीसी काम प्रगतिपथावर असून, जुलै २०१९ पर्यंत ते पूर्ण होणे अपेक्षित आहे. पुढील दोन वर्षात चार हजार प्रत्यक्ष रोजगार निर्मिती अपेक्षित असून २५ हजार नोकºया निर्माण करण्याची क्षमता आहे. तसेच पुढील दोन वर्षात ४५० कोटींची गुंतवणूक अपेक्षित असून, पूर्ण सेझच्या माध्यमातून चार हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे.