जेएनपीटी-चांदणी चौकात अज्ञात वाहनाच्या धडकेत सुरक्षा रक्षकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2019 04:34 PM2019-09-21T16:34:15+5:302019-09-21T16:34:36+5:30

आर्थिक नुकसान भरपाईसाठी मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबियांचा नकार: २४ तास मृतदेह रुग्णालयातच

Security guard dies in collision with unknown vehicle at JNPT-Chandni Chowk | जेएनपीटी-चांदणी चौकात अज्ञात वाहनाच्या धडकेत सुरक्षा रक्षकाचा मृत्यू

जेएनपीटी-चांदणी चौकात अज्ञात वाहनाच्या धडकेत सुरक्षा रक्षकाचा मृत्यू

Next

मधुकर ठाकूर
उरण : जेएनपीटीत खासगी सुरक्षा रक्षक म्हणून  काम करणाऱ्या रोशन केळकर यांचा शुक्रवारी (२०) रात्री जेएनपीटी-चांदणी चौकात अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. मृताच्या नातेवाईकांनी जोपर्यंत जेएनपीटी आर्थिक नुकसान भरपाईची घोषणा करीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. मृताचे कुटुंबिय, रायगड सुरक्षा रक्षक महामंडळाचे सदस्य आणि येथील काही कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनीही यासाठी जेएनपीटीच्या हॉस्पिटल समोर ठिय्या मांडला. त्यामुळे २४ तास मृतदेह रुग्णालयातच होता. जेएनपीटीने दिलेल्या आश्वासनानंतरच मृतदेह ताब्यात घेण्यात आला. 


जेएनपीटी टाऊनशीप येथे कार्यरत असलेले सुरक्षा रक्षक रोशन केळकर (रा.कोटनाका-उरण) हे 20 सप्टेंबर रोजी रात्रपाळीत काम करीत होते.गुरुवारी रात्री आपल्या अन्य सहकाऱ्यांसोबत करळफाटा ब्रिज आणि चांदणी चौक परिसरात ट्राफिक कंट्रोलसाठी गस्त घालीत होते. त्याच दरम्यान चांदणी चौक येथे अज्ञात वाहनाने  रोशन यांना जोरदार धडक दिली.उपचारासाठी जेएनपीटीच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.


  दरम्यान अपघातांची माहिती मिळताच रायगड सुरक्षा रक्षक महामंडळाचे सदस्य आणि येथील काही कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.त्यांनी अपघाती वाहनाचा सर्वत्र शोध घेण्याचाही प्रयत्न केला.मात्र अज्ञात वाहनाने घटनास्थळावरून केव्हाच पलायन केले होते. पोलिसांनाही खबर दिल्यानंतरही अपघाती वाहन अथवा वाहनचालकही सापडला नाही.त्यामुळे संतप्त. झालेल्या रायगड सुरक्षा रक्षक महामंडळाचे सदस्य आणि येथील काही कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जेएनपीटीकडून कुटुंबाला नुकसान भरपाई मिळत नाही आणि अपघात करणाऱ्या वाहनाचा शोध लागत नाही,जोपर्यंत  न्हावा शेवा पोलीस स्टेशनमध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास  नकार दिला.तसेच सकाळी जेएनपीटी हॉस्पिटलसमोर जमलेला जमाव आणि रायगड सुरक्षा रक्षक महामंडळाचे सदस्य, माजी कामगार ट्रस्टी रविंद्र पाटील, भूषण पाटील, सुरेश पाटील,उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील आणि येथील काही कामगार संघटनांच्या पदाधिकारी आणि मृतांच्या नातेवाईकांनी ठिय्या आंदोलन केले.


   परिस्थिती चिघळण्याची शक्यता निर्माण झाल्याने जेएनपीटीने तत्काळ शनिवारी सकाळी बैठक घेतली.मुंबई हायकोर्टाने दिलेल्या आदेशानुसारच जेएनपीटी टाऊनशीप येथे कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांना पगार न करण्याची धमकी देऊन तसेच त्यांना ट्राफिक कंट्रोलचे कोणतेही प्रशिक्षण न देताच  जबरदस्तीने करळ फाटा ब्रिज परिसरामध्ये वाहतूक पोलिसांना मदतनीस (ट्राफिक वार्डन)म्हणून काम करण्यास पाठवणारे जेएनपीटीच्या अधिकाऱ्यांविरोधात जोरदार आवाज उठविला.जेएनपीटी अधिकाऱ्यांवर बेजबाबदारपणाचे आरोप करीत बैठकीत उपस्थितांनी मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक नुकसान भरपाईची घोषणा होईपर्यंत मृतदेहही ताब्यात घेण्यात येणार नाही अशी तंबीही देण्यात आली. त्यामुळे वठणीवर आलेल्या जेएनपीटी अधिकाऱ्यांनी मृताच्या कुटुंबीयांना सीएसआर फंडातून आर्थिक मदत देण्याची घोषणा केली.त्याचबरोबर रायगड सुरक्षा रक्षक महामंडळाचे सदस्य असलेल्या मृताच्या कुटुंबीयांना मंडळाकडून विविध प्रकारचे आर्थिक लाभ मिळविण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासनही देण्यात आले.त्यानंतर सुरक्षा रक्षक रोशन केळकर यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती न्हावा शेवा बंदर पोलीस विभागांचे एसीपी विठ्ठल दामगुडे यांनी दिली.

Web Title: Security guard dies in collision with unknown vehicle at JNPT-Chandni Chowk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.