रायगडच्या १४ शाळांची आदर्श शाळेसाठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 01:00 AM2020-10-27T01:00:45+5:302020-10-27T01:01:21+5:30

Raigad News : भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता यावर विशेष भर देण्यात येणार असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यास मदत होणार आहे.

Selection of 14 schools of Raigad for ideal school | रायगडच्या १४ शाळांची आदर्श शाळेसाठी निवड

रायगडच्या १४ शाळांची आदर्श शाळेसाठी निवड

Next

रायगड : जिल्ह्यातील तब्बल १४ शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित करण्यात येणार आहेत. शाळांची यादी निश्चित झाल्यानंतर सरकारी, जिल्हा आणि ग्राम स्तरावर अभिसरण करण्यात येणार आहे. भौतिक सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता यावर विशेष भर देण्यात येणार असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यास मदत होणार आहे.
मार्च, २०२० रोजी राज्याच्या द्वितीय अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये याबाबतची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार, सरकारने याबाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सुरुवातीला रायगड जिल्हा परिषदेच्या पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा या योजनेत समाविष्ट करण्यात येणार आहेत, तसेच गरज पडल्यास इयत्ता आठवीचे वर्गही जोडण्याचा सरकारचा विचार आहे.
आदर्श शाळाच्या यादीमध्ये अलिबाग तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या वायशेतमधील शाळेचा समावेश आहे. त्याचप्रमाणे, कर्जत- कळंब, खालापूर-चौक, माणगाव- तळाशेत, म्हसळा-म्हसळा, मुरुड-मझगाव, पेण-आमटेम, पोलादपूर- लोहारे, रोहा-कोलाड, श्रीवर्धन- वडवली, सुधागड-वावोशी, तळा-वाशी हवेली, उरण-जुई, पनवेल- वावेघर येथील जिल्हा परिषदेच्या शाळांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील १४ शाळांचा समावेश सरकारने आदर्श शाळा योजनेत केला आहे. ही चांगली बाब आहे. आदर्श शाळा करण्यासाठी आवश्यक असणारे आर्थिक साहाय्य, सोईसुविधा निर्माण करण्यासाठी आवश्यकती मदत करण्यात येईल. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल.
-डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद

Web Title: Selection of 14 schools of Raigad for ideal school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.