शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

बीएमसीटीमध्ये कामगार भरतीसाठी ७०० अर्र्जांची निवड

By admin | Published: June 01, 2017 5:16 AM

बीएमसीटीमध्ये कामगार भरतीसाठी ७०० अर्र्जांची निवडजेएनपीटी बंदराअंतर्गत उभारण्यात येत असलेल्या सर्वात मोठ्या लांबीच्या आणि क्षमतेच्या चौथ्या भारत मुंबई कंटेनर टर्मिनल्स

लोकमत न्यूज नेटवर्कउरण : जेएनपीटी बंदराअंतर्गत उभारण्यात येत असलेल्या सर्वात मोठ्या लांबीच्या आणि क्षमतेच्या चौथ्या भारत मुंबई कंटेनर टर्मिनल्स (बीएमसीटी) या अत्याधुनिक बंदरासाठी ५ जूनपासून कामगार भरती प्रक्रिया पुन्हा सुरु होणार आहे. आॅपरेशन, इंजिनिअरिंग आदि विभागासाठी पदविका आणि पदवीधारक प्रशिक्षणार्थींची भरती तीन टप्प्यात केली जाणार असून पहिल्या टप्प्यासाठी आलेल्या ७००० अर्जांमधून ७०० अर्जांची निवड करण्यात आली असल्याची माहिती कंपनी अधिकाऱ्यांनी दिली.जेएनपीटीच्या इतर सर्व कंटेनर टर्मिनल्समध्ये प्रशिक्षणार्थीसाठी वयाची अट कमाल २५ वर्षे ठेवण्यात आली आहे. मात्र बीएमसीटीने कामगार भरतीची मर्यादा ३० वर्षापर्यंत वाढविली आहे. या अत्याधुनिक टर्मिनलमध्ये वापरण्यात येणाऱ्या एका सिंगल क्वाय क्रेन्सची किंमत ८ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स इतकी आहे. यशस्वी अर्जदारांना बंदरावरील अद्ययावत उपकरणांची हाताळणी आणि देखभाल करता येणार आहे. या उद्योग क्षेत्रामध्ये पाळल्या जाणाऱ्या कार्यपध्दतीचे पालन करण्यासाठी बीएमसीटीला उच्च दर्जाचे तंत्रज्ञान आणि तांत्रिक कौशल्याची गरज आहे. या पदांसाठी पात्रता म्हणून पदवी, पदविकाधारक असण्याची ही अट जेएनपीटीच्या इतर कंटेनर टर्मिनल्ससाठी ठेवण्यात आलेला पात्रतेपक्षा वेगळी नसल्याचा दावाही प्रकल्पाकडून केला जात आहे. बीएमसीटीमध्ये होणाऱ्या कामगार भरतीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये निवड झालेल्या ७०० उमेदवारांना पारखून घेण्यासाठी गुंतागुंतीची आणि आधुनिक उपकरणे हाताळण्यासाठी अद्ययावत पध्दतीचा अवलंब करुन चाचण्या घेण्यात येणार आहेत. निवड झालेले सर्वच उमेदवार प्रकल्पबाधित आहेत. ही प्रक्रिया ५ जूनपासून एका खास चाचणी स्थळावर सुरु होणार आहे. उमेदवारांच्या चाचणीसाठी वापरण्यात येणारी पध्दत आंतरराष्ट्रीय मानकांवर पारदर्शक असणार आहे. या टप्प्यातून पार होत तिसऱ्या टप्प्यापर्यंत पोहचलेल्या उमेदवाराच्या मुलाखतीनंतरच अंतिम कामगार भरती केली जाणार असल्याचे प्रकल्पाकडून सांगण्यात येत आहे.बीएमसीटीमध्ये निर्माण होणाऱ्या प्रत्येक नोकरीमागे प्रकल्प परिसरातील किमान १० नोकऱ्या तयार होणार असून संबंधित इतर उद्योग क्षेत्रांमध्येही नोकऱ्या तयार होतात. केवळ बीएमसीटी नव्हे तर कंत्राटदारांच्या आणि इतर उद्योगक्षेत्रांमधूनही हजारो नोकऱ्या तयार होणार असल्याचा दावा कंपनी अधिकाऱ्याकडून केला जात आहे. बीएमसीटी आपली कार्यक्षमता दुपटीने विस्तारित असताना, या प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यामध्ये किमान ५०० तर २०२१ पर्यंत तयार होणाऱ्या टप्प्याच्या अखेरीस याहून ही अधिक पटीने नोकऱ्या निर्माण होतील, अशी अपेक्षाही अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे.ट्रकचालक, टॅलीमेनचा समावेशच्या नोकऱ्या विविध गटातील, विविध पात्रता धारण करणाऱ्या व अनुभवाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर असलेल्या लोकांसाठीही असणार आहेत. आवश्यक ती पात्रता बाळगणाऱ्या प्रकल्पबाधित उमेदवारांना बीएमसीटीकडून प्राधान्य देण्यात येणार आहे. बीएमसीटीच्या कंत्राटदारांनाही तसेच करण्याचा सल्ला दिला जाणार असून या नोकऱ्यांमध्ये ट्रक चालक, टॅलीमेन व लेशिन वर्कर्सचा समावेश आहे. बीएमसीटीने कामगार भरतीमध्ये पारदर्शकता धोरणाला अनुसरुन सर्वच राजकीय पक्षांशी संपर्क साधून भरती प्रक्रियेची स्पष्टपणे कल्पना दिली आहे. टर्मिनलचे काम वेळापत्रकानुसार सुरु होण्याचे महत्त्वही राजकीय पक्षांना समजावून दिले असल्याचे प्रकल्पाचे म्हणणे आहे. चौथे कंटेनर टर्मिनल सुरु होत असल्याने सध्या अत्यंत गरजेच्या साधनांची वाढ साधणे शक्य होणार असून त्यातून परिसरात रोजगारनिर्मितीही होणार आहे.च्मागील काही वर्षांत जेएनपीटी बंदरावर उतरणाऱ्या मालाच्या प्रमाणात फारशी वाढ होत नाही. त्याऐवजी गुजरातमधील बंदरावर मालाचा ओघ वाढला असून त्यामुळे उरणमधील नोकऱ्या आणि आर्थिक भरभराटीचे गणित कोलमडले आहे. भारतातील सर्वात मोठे कंटेनर टर्मिनल बंदर यशस्वी झाल्यास बीएमसीटीच्या माध्यमातून या भागातील सर्व प्रकारातील पात्रता असलेल्या व विविध वयोगटातील लोकांसाठी अनेक नोकऱ्या तयार होतील असा दावाही प्रकल्पाने केला आहे.