एकाच जमिनीची दोनदा विक्र ी
By admin | Published: October 3, 2015 11:30 PM2015-10-03T23:30:39+5:302015-10-03T23:30:39+5:30
एकाच जागेचा दोघांशी व्यवहार करून सुमारे 33 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरोधात खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एक जण
खालापूर : एकाच जागेचा दोघांशी व्यवहार करून सुमारे 33 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरोधात खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एक जण राष्ट्रवादी काँग्रेसचा नेता असून खालापूरचे पोलीस उपनिरिक्षक सचिन काशिद या गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत. खालापूरमध्ये जमिनीला सोन्याचा भाव असल्याने अनेक राजकीय पक्षांचे प्रमुख नेते व कार्यकर्ते दलालीमध्ये गुंतले असून एकच जागा दाखवून अनेकांकडून पैसे लाटल्याचे अनेक प्रकारही समोर येत आहेत.
खालापूर तालुक्यातील गोरठण येथे असलेली ९ एकर जमीन संजय दौलत पालांडे यांनी २ जुलै २००७ रोजी रामदास पांडुरंग दिसले यांना विकण्यासाठी साठेकरार केला होता. या व्यवहाराचे दिसले यांनी सुमारे 33 लाख रूपये पालांडे यांना चेकद्वारे दिले होते. दिसले यांच्याकडून 33 लाख रूपये घेतल्यानंतर सदर जमिनीचा व्यवहार संभाजी पाटील यांच्या बरोबर १ आॅगस्ट २००७ रोजी करण्यात आला. या दरम्यान रामदास दिसले यांचा मृत्यु झाला. त्यांचा मुलगा कुमार याच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्याने आपले पैसे परत मिळावेत म्हणून पालांडे यांच्याकडे तगादा लावला होता. त्यामुळे पालांडे यांनी दिसले यांना चेक दिले होते. मात्र सदर चेक न वटल्याने कुमार दिसले यांनी खालापूर न्यायालयात दावा दाखल केला होता. या प्रकरणात तडजोड झाल्यानंतर पालांडे यांनी २८ मार्च २०१४ रोजी १३ लाख ६० हजार रूपये परत दिले होते. तर उर्विरत रकमेपाटी पुन्हा 3 चेक दिले होते. मात्र ते चेकही न वटल्याने या प्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात पसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पालांडे पोलीस ठाण्यात हजर झाले होते. मात्र मध्यस्ती असलेले राष्ट्रवादीचे स्थानिक नेते भगवान दळवी चार दिवस फरार होते. अलिबाग न्यायालयात दळवी यांनी अटकपूर्व जामिनासाठी केलेला अर्ज न्यायालयाने मान्य केला असून पोलिसांना सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत. (वार्ताहर)