डाक विभागाच्या मदतीने दिवाळी फराळ पाठवा जगभरात
By वैभव गायकर | Published: November 7, 2023 03:47 PM2023-11-07T15:47:42+5:302023-11-07T15:48:54+5:30
भारतीय डाक विभागामार्फेत दिवाळी फराळ विदेशात पाठवण्यासाठी खास सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
लोकमत न्युज नेटवर्क वैभव गायकर पनवेल:दिवाळी म्हटली की आठवण येते ती खमंग दिवाळी फराळाची. परंतू नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांना बरेचदा फराळा शिवाय दिवाळी साजरी करायची येतेमात्र आता भारतीय डाक विभागाच्या माध्यमातून आपल्या परदेशस्थ प्रियजनांना अस्सल घरघुती दिवाळी फराळ पाठविणे शक्य आहे. भारतीय डाक विभागामार्फेत दिवाळी फराळ विदेशात पाठवण्यासाठी खास सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
नवी मुंबई या विकसीत विभागातील बरेचसे विद्यार्थीआयटी क्षेत्रातील कर्मचारी विदेशात वास्तव्यास आहेतआता डाक विभागाच्या माध्यमातून त्यांना घरी बनवलेला दिवाळी फराळ पाठवता येणे शक्य आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी नवी मुंबई डाक विभागातील पनवेल हेड पोष्ट ऑफीस, नेरुळ नोड ३, वाशी मुख्य डाक घर, ऐरोली या पोष्ट ऑफीसमध्ये दिवाळी फराळ विदेशात पाठवण्यासाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. डाक विभागामार्फत विदेशात पार्सल पाठविण्याचे दर अत्यंत माफक आहेत.
वरील पोष्ट ऑफीसमध्ये सुरक्षीत पार्सल पॅकेजिंग सुविधा सुद्धा वाजवी दरात उपलब्ध असेल.डाक विभागाच्या या सुविधेचा लाभ नागरिकांनी घ्यावा व दिवाळीचा आनंद आपल्या प्रियजनांना सोबत द्विगुणित करावा असे आवाहन नवी मुंबई डाक विभागाचे वरिष्ठ अधिक्षक?नितीन येवला यांनी केले आहे. प्रतिक्रिया - भारतीय डाक विभागाच्या माध्यमातून जगाच्या कानाकोपऱ्यात दिवाळी फराळ पाठविणे शक्य आहे. आपल्या प्रियजनांना माफक दरात जलदपणे आणि सुरक्षीत रित्या दिवाळी फराळ पाठवण्यासाठी डाक विभागाच्या सेवेचा लाभ नागरिकांनी घ्यावा - नितीन येवला (वरिष्ठ अधिक्षक डाकघरनवी मुंबई डाक विभाग)