ज्येष्ठ प्रवाशाला एसटीत मारहाण

By admin | Published: September 26, 2015 12:57 AM2015-09-26T00:57:40+5:302015-09-26T00:57:40+5:30

वेळ निघून गेल्यानंतरही एसटी न सुटल्याने बस का थांबली, असा प्रश्न करणाऱ्या ज्येष्ठ प्रवाशाला आपण एसटी अधिकारी असल्याचे सांगत एकाने साथीदारासह मारहाण

Senior Resident Strike | ज्येष्ठ प्रवाशाला एसटीत मारहाण

ज्येष्ठ प्रवाशाला एसटीत मारहाण

Next

रोहा/ लोणेरे : वेळ निघून गेल्यानंतरही एसटी न सुटल्याने बस का थांबली, असा प्रश्न करणाऱ्या ज्येष्ठ प्रवाशाला आपण एसटी अधिकारी असल्याचे सांगत एकाने साथीदारासह मारहाण करीत एसटीतून बाहेर ढकलल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या झटापटीत त्याच्यातील एकाने त्या प्रवाशाच्या गळ्यातील चेनही हिसकावून घेतली. याप्रकरणी रोहा पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोहा पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार बुधवारी (२३ सप्टेंबर) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास यशवंत कृष्णा खराडे (५९) हे ज्येष्ठ प्रवासी तिसे गावी येथे जाण्यासाठी रोहा-कोल्हापूर बसमध्ये चढले. वाहकाच्या सीटच्या बाजूला ते उभे राहिले. एसटी बस सुटण्याची वेळ झाल्याने त्यांनी बस का थांबली? अशी विचारणा केली. तेव्हा वाहकाच्या सीटवर बसलेल्या एकाने म्हाताऱ्या तुला काय करायचे आहे? मी एसटी खात्याचा अधिकारी आहे? माझी बॅग द्यायला पाठविले आहे, तो आला की एसटी चालू होईल, असे उर्मटपणे सांगितले.त्यामुळे यशवंत खराडे यांनी जरा जपून बोला, असे सांगितले. त्याचा राग आल्याने सीटवर बसलेली ती व्यक्ती उठली आणि आपल्या आणखी एका सहकाऱ्याच्या साथीने त्याने त्या ज्येष्ठ प्रवाशाला शिवीगाळ करत मारहाण केली. त्यापैकी एकाने त्या प्रवाशाच्या गळ्यातील सोन्याची चेन जबरदस्तीने खेचून घेतली. त्यांना एसटीमधून खाली ढकलून दिले. या घटनेनंतर यशवंत खराडे यांनी रोहा पोलीस ठाण्यात तक्र ार दाखल केली.(वार्ताहर)

Web Title: Senior Resident Strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.