"सावली गौरव" पुरस्काराकरीता लाेकमतचे वरिष्ठ उप संपादक जयंत धुळप यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 11:51 AM2018-06-14T11:51:42+5:302018-06-14T11:51:42+5:30
सावली सामाजिक संस्थेमार्फत देण्यात येणार्या यंदाच्या "सावली गौरव" पुरस्काराकरीता लाेकमतचे वरीष्ठ उपसंपादक जयंत धुळप यांची पुरस्कार निवड समीतीने निवड
अलिबाग- सावली सामाजिक संस्थेमार्फत देण्यात येणार्या यंदाच्या "सावली गौरव" पुरस्काराकरीता लाेकमतचे वरीष्ठ उपसंपादक जयंत धुळप यांची पुरस्कार निवड समीतीने निवड केली असल्याची माहिती सावली सामाजिक संस्थेचे संस्थापक प्राणिमित्र गणराज जैन व डाॅ.अर्चना जैन यांनी दिली आहे.
जयंत धुळप गेली तिस वर्ष काेकणातील पत्रकारीता क्षेत्रात सक्रीय व प्रभावीपणे कार्यरत आहेत.आपल्या पत्रकारीतेच्या माध्यमातून त्यांनी समाजातील गरीब, कष्टकरी, कामगार, शेतकरी यांना नेहमच न्याय मिळवून दिला आहे. त्याचप्रमाणे सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रासाठी आपल्या ज्वलंत लेखनीच्या माध्यमातून उल्लेखनिय कार्य केले आहे.विकास प्रक्रीयेतील सकारात्म विचारसरणीचे पत्रकार असा त्यांचा नावलाैकीक आहे. पर्यावरण हा त्यांचा व्यक्तीगत अभ्यासाचा विषय आहे.आतापर्यंत त्यांना विविध पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे.त्यात महाराष्ट्र शासनाचा विकास वार्तापारिताेषीक सलग तिन वर्ष मिळविण्याचा विकम त्यांनी प्रस्थापित केला आहे.
यापूर्वी "सावली गौरव" पुरस्कार महाड अर्बन बॅन्केच्या अध्यक्षा शाेभाताई सावंत, ज्येष्ठ बालराेग तज्ज्ञ तथा चला मुलांना घडवूया या चळवळीचे प्रणेते डाॅ.चंद्रशेखर दाभाडकर, सहकार व शिक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते अॅड.विनाेद देशमुख आणि हिरवळ प्रतिष्ठानचे प्रमुख किशाेर धारीया यांना प्रदान करण्यात आले आहेत.
रविवार दि.२४ जून रोजी बदलापुर येथील माेरे मंगलकार्य सभागृहात संध्याकाळी ५.३० वाजता आयाेजित एका विशेष कार्यक्रमात धुळप यांना "सावली गौरव" पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.यावेळी ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे यांच्या रंगकवितेचे या काव्यमैफिलीचे आयाेजन करण्यात आले आहे.सावली सामाजिक संस्थेमार्फत जाहीर झालेल्या पुरस्काराने विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून अभिनंदनाचा वर्षाव हाेत आहे.