शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

रायगडमध्ये अपघातांची मालिका सुरूच, एक ठार तर १८ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 5:00 AM

विविध ठिकाणी सहा अपघात : एक ठार तर १८ जखमी; मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचा फटका

जयंत धुळप

अलिबाग : गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग, राज्य मार्ग आणि अंतर्गत रस्त्यावर वाहन अपघातांचे प्रमाण वाढले आहे. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत सहा विविध वाहन अपघातात १ जण ठार तर १८ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर गोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी मध्यरात्री १.४० वाजण्याच्या सुमारास माणगावकडे जाणाऱ्या पिकअप जीपचालकाने (एम.एच.०६ /जी ९४८७) अचानक बे्रक लावल्याने मागून येणाºया दुचाकीची (एम.एच.०६/बीटी ८९९९) जीपला जोरदार धडक बसली.

या अपघातात दुचाकीवरील नितेश परशुराम मालोदे आणि सनी संजय जांबरे हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गोरेगाव पोलिसांनी या अपघात प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.माणगाव-पुणे रस्त्यावर सणसवाडी येथे रविवारी पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास कार (एम.एच.१२ एन.ई.६१३८) हलगर्जीपणे चालवल्याने कारवरील नियंत्रण सुटल्याने ती रस्त्यालगत पलटी झाली. या अपघातात कारचालक अमित वाघ याचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तानाजी नामदेव निकटे, योगेश एकनाथ निकटे, राजू रमण पाटील, सूरज नंदकुमार कदम, अक्षय शेळके, यज्ञेश पोवले, नागेश मोहकर (सर्व रा. पिरंगुट, ता.मुळशी, पुणे) हे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघात प्रकरणी माणगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.श्रीवर्धन पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास भरडखोलकडून श्रीवर्धनकडे जाणाºया दुचाकीस (एम .एच.०६ बी.के ३७३०) समोरून आलेल्या स्कॉर्पिओ कारने जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील प्रथमेश गजानन खोपटकर (१८) आणि अविकार गोविंद खोपटकर (१५) दोघेही रा.भरडखोल-श्रीवर्धन हे जखमी झाले. त्यांना श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर फरार चालकाचा श्रीवर्धन पोलीस शोध घेत आहेत. दिवाळीच्या सुटीनिमित्त महामार्गावर वाहनांची संख्या वाढली असून अपघातांचे प्रमाणही वाढले आहे.महामार्गावर एसटी-दुचाकी अपघातात एक ठारदासगाव : मुंबई-गोवा महामार्गावर दासगाव गावाजवळ सोमवारी दुपारी दोन वाजण्याचा सुमारास एसटी आणि दोन दुचाकीस्वारात अपघात झाला. या अपघातात एक मुलगी जागीच ठार झाली तर दोन दुचाकीवरील चार जण जखमी झाले आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर दासगाव गावाजवळ एसटी आणि दोन दुचाकींमध्ये अपघात झाला. अपघातात माणगावकडून महाडकडे येणाºया एसटी बसची शेजारून जात असलेल्या दुचाकीला धडक दिली. याच दरम्यान समोरून आलेला दुचाकीस्वारही येऊन आपटला. जनार्दन डोंगरे हे आपल्या ताब्यातील दुचाकीने (एम. एच.0६ बी.ए. ६४३८) आपल्या दोन भाच्यांना घेऊन महाडकडे जात होते. तर समोरील बाजूने प्रजाल सुधीर गावडे आणि सुभाष नाडकर हे दुचाकीने (एम.एच.0६ बी.क्यू. ३८८२) महाडहून तळेगावकडे जात होते. या अपघातात टोळ गावातून महाडकडे येत असलेल्या दुचाकीवरील वैष्णवी सुधीर मनवे (१७) हिचा मृत्यू झाला. तर दुचाकीस्वार जनार्दन डोंगरे आणि वैभवी मनवे, प्रजाल सुधीर गावडे आणि सुभाष नाडकर असे चार जण गंभीर जखमी झाले. मूळच्या वहूर येथील रहिवासी असलेल्या या दोघी बहिणी दहिसरहून दिवाळीनिमित्त गावी मामाकडे टोळ गावी आल्या होत्या. टोळ येथून मुंबईला जाण्यासाठी दुचाकीवरून महाडमध्ये येत असताना हा अपघात झाला. अपघातानंतर एस.टी. चालकाने बस अपघातस्थळी न थांबवता थेट महाड आगार गाठले. अपघातस्थळी एसटीच्या मागून येणाºया वाहन चालकांनी पाठलाग चालकाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.डंपरची कारला धडकच्गोवा राष्ट्रीय महामार्गावर वडखळजवळच्या कोलेटी गावी शनिवारी संध्याकाळी ठाणे येथून कानसई येथे जाणाºया कारला (एम. एच.०६ बी.एम.६४८३) पेट्रोलपंपाजवळ पेणकडे जाणाºया डंपरने (एम.एच. ०५/ सी. ए. ४९३३) जोरदार धडक दिली. 

टॅग्स :RaigadरायगडalibaugअलिबागAccidentअपघात