बीएसएनएलची सेवा सहा महिन्यांपासून ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2018 04:53 AM2018-11-17T04:53:52+5:302018-11-17T04:54:18+5:30

चौपदरीकरणाचा फटका : केबल तुटल्याने बँका, टपाल सेवेवर परिणाम

Service of BSNL has been suspended for six months | बीएसएनएलची सेवा सहा महिन्यांपासून ठप्प

बीएसएनएलची सेवा सहा महिन्यांपासून ठप्प

Next

सिकंदर अनवारे

दासगाव : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्यातील चौपदरीकरणाला सुरुवात झाली आहे. मात्र कामाचा महामार्गालगतच्या अनेक गावातील ग्रामपंचायती, बँका आणि पोस्ट खात्याच्या नेट सुविधेला फटका बसला आहे. याचे मूळ कारण नियम धाब्यावर बसवून रस्त्यालगत टाकण्यात आलेली ओ. एफ. सी. केबल होय.

सध्या महाड ते दासगाव या परिसरात सुरू असलेल्या चौपदरीकरणाच्या कामामुळे वारंवार बीएसएनएलची ओ. एफ. सी. केबल तुटत असून याकडे अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. गेले सहा महिने या भागातील इंटरनेट सेवा बंद असून शासनाचे कोट्यवधींचे नुकसान होत आहे. बँका, टपाल सेवांची अनेक कामे आॅनलाइन झाल्याने इंटरनेट महत्त्वाचे ठरत असूनही दुर्लक्ष होत आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाला वेग आला असून अनेक ठिकाणी वळण, वळणावरील डोंगर आणि मोºयांच्या कामासाठी ठेकेदार कंपनीकडून खोदकाम सुरू आहे. या खोदकामामध्ये अनेक कंपन्यांनी टाकलेल्या इंटरनेट सेवेच्या केबल तुटत आहेत.

खोदकामाच्या वेळी इतर कंपन्यांचे अभियंते तसेच कर्मचारी हजर राहून तुटलेल्या केबल जोडण्याचे काम करत आहे. मात्र बीएसएनएल कंपनीचे तातडीने काम तर सोडाच तक्रारी येवून देखील कामांकडे दुर्लक्ष होत आहेत. त्यामुळे दासगाव विभागात गेल्या सहा महिन्यांपासून बीएसएनएलची सेवा बंद पडली आहे. पूर्वी टाकण्यात आलेली केबल ही अनधिकृतपणे असून शासनाच्या नियमाप्रमाणे राष्ट्रीय महामार्ग तसेच राज्यमार्गावर शासनाने ठरवून दिलेल्या अंतरावरूनच ही केबल टाक णे गरजेचे असते. ठेकेदार कंपनीकडून महामार्ग विभाग किंवा सार्वजनिक बांधकाम विभाग खोदकाम कामामध्ये होणाºया नुकसानीची अनामत रक्कम भरून जेव्हा केबल टाकण्यासाठी परवानगी देते, मात्र त्यानंतर ठेकेदार कंपनी सर्वच नियम धाब्यावर बसून रस्त्याच्या साइडपट्टीचे खोदकाम करूनच केबल टाकण्याचे काम करते. त्याचाच फटका चौपदरीकरणाच्या दुसºया टप्प्याच्या कामामध्ये काही गावांना बसतो आहे. दासगाव, वीर, टोल, दाभोळ, वहूर अशा अनेक गावांच्या बीएसएनएल टेलिफोन आणि नेटसेवा सहा महिन्यांपासून ठप्प झाल्या आहेत. परिणामी शासकीय खात्यातील बहुतांश कामकाज ठप्प आहेत. पर्याय म्हणून काही ठिकाणी खासगी कंपन्यांची इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली आहे.

दुर्लक्ष करणाºयांवर कारवाईची मागणी
च्चौपदरीकरणाच्या कामामध्ये इतर टेलिफोन कंपन्या तुटलेल्या ओएफसी केबल ज्या पद्धतीने रिपेअरिंगचे काम करत आहेत, त्याप्रकारे बीएसएनएल कंपनीचे अधिकारी काम करत नाही. बंद असलेल्या नेट सुविधेकडे वरिष्ठांनी तातडीने लक्ष घालून गैरसोय दूर करावी. कामात चालढकल करणाºया अधिकाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून दासगाव ग्रा. पं.ची नेट सुविधा बंद आहे. ग्रा.पं. स्तरावरून होणाºया आॅनलाइन कामासाठी फार मोठी अडचण निर्माण होत आहे.
- अजित पोलेकर, ग्रामसेवक, दासगाव
गेली सहा महिने पोस्ट आॅफिसचा टेलिफोन बंद आहे, तर त्या सोबत बीएसएनएलची नेट सुविधाही बंद आहे. सध्या दुसºया खासगी कंपनीचे नेट वापरत आहोत. त्याचीही रेंज नेहमी जात असते. अशावेळी काम ठप्प होवून खेड्यापाड्यातील येणाºया नागरिकांचे मोठे हाल होत आहेत.
- एम. एम. रोडगे, दासगाव, पोस्ट मास्तर

बीएसएनएलचे जिल्हा मॅनेजर सी. व्ही. राव यांच्याकडे संपर्क साधला असता नेट सेवा बंद असल्याचे कारण ठेकेदाराकडून चौपदरीकरणाच्या होणाºया कामात वारंवार केबल तोडण्याचे काम होत असल्याचे सांगत इतर इतर प्रश्नांची उत्तरे देण्यास टाळाटाळ केली.

Web Title: Service of BSNL has been suspended for six months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.