शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
4
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
5
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
6
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
7
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
8
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
9
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
10
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
11
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
12
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
13
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
14
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
15
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
16
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
17
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
18
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
19
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
20
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय

रायगड जिल्ह्यात मेडिकल हब निर्माण करणार; आदिती तटकरे यांचे प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2020 12:17 AM

नव्याने वैद्यकीय महाविद्यालयासाठी अलिबागजवळील उसर येथे एमआयडीसी व इतर मिळून ५० एकरहून अधिक जागा निश्चित करण्‍यात आली आहे.

अलिबाग : रायगड जिल्ह्यात मेडिकल हब निर्माण करण्यात येणार आहे. रायगडच्या जनतेला अत्याधुनिक सोईसुविधांनी सुसज्ज अशी प्रगत आरोग्य सेवा देण्यासाठी महाविकास आघाडी सरकार आग्रही आहे, असे प्रतिपादन रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे.

अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाबाबत पाहणी केली. यावेळी प्रस्‍तावित रुग्‍णालयाचे अधिष्‍ठाता डॉ.गिरीश ठाकूर, जिल्हाधिकारी निधी चौधरी, जिल्हा शल्य चिकित्सक सुहास माने, प्रांताधिकारी शारदा पोवार, तहसीलदार सचिन शेजाळ, आरसीएफचे अधिकारी देशमुख, जिल्‍हा रुगणालयातील अधिकारी आदी उपस्थित होते.

गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या मेडिकल काॅलेजचा प्रश्न सोडवून ते लवकरच सुरू करण्यात यावे, यासाठी पालकमंत्री आदिती तटकरे यांनी पाहणी दौरा केला, तसेच शासकीय महाविद्यालयात येणाऱ्या मुलांना वसतिगृहाची व्यवस्था करण्यासाठी आरसीएफ वसाहत कुरुळ येथे ही भेट दिली, तसेच हे महाविद्यालय लवकर सुरू करण्‍याचा विचार असून, केंद्र सरकारचे पथक लवकरच पाहणीसाठी येणार असल्‍याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली.

नव्याने वैद्यकीय महाविद्यालयासाठी अलिबागजवळील उसर येथे एमआयडीसी व इतर मिळून ५० एकरहून अधिक जागा निश्चित करण्‍यात आली आहे. त्‍याबाबतचा प्रस्‍तावही शासनाला पाठविण्‍यात आला असून, तात्‍पुरत्‍या स्‍वरूपात हे कॉलेज सुरू करण्‍यासाठी जिल्‍हा रुग्‍णालयाची सध्‍याची उपलब्‍ध जागा अपुरी पडणार आहे. त्‍यामुळे कुरुळ येथील आरसीएफ वसाहतीमधील इमारती वापरता येतील का, याची पाहणी करून आदिती तटकरे यांनी आढावा घेतला, 

अन्‍य कामेही पूर्ण करा सामान्य रुग्णालय परिसरातील अन्‍य इमारतींची कामेही तातडीने पूर्ण करण्‍यास सांगितले आहे. सध्या रुग्‍णालयाची जागा अपुरी पडते आहे, हे खरे आहे. परंतु नवीन प्रशस्‍त जागेत जिल्‍हा रुग्‍णालय उभारण्‍याचा मानस तटकरे यांनी व्‍यक्‍त केला, तर भविष्‍यात आयुर्वेदिक विभाग सुरू करण्‍याचा प्रयत्‍न आहे. मागील वर्षात रायगडच्‍या वैद्यकीय महाविद्यालयाला अर्थसंकल्‍पात अजित पवार यांनी मंजुरी दिली. राज्‍यातून अनेक जिल्‍ह्यांचे प्रस्‍ताव गेले आहेत, परंतु सर्वात प्रथम रायगडच्‍या वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रस्‍ताव केंद्र शासनाकडे पाठविला आहे. त्‍यामुळे रायगडमधील वैद्यकीय महाविद्यालय आधी सुरू व्‍हावे, पुढील शैक्षणिक वर्षात पहिली बॅच सुरू करण्‍याचा प्रयत्‍न आहे.

टॅग्स :Aditi Tatkareअदिती तटकरे