शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

म्हसळा तालुक्यातील सात अंगणवाड्या धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 2:14 AM

शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असणाऱ्या तोंडसुरे, चिखलप, मेंदडी कोळीवाडा, मेंदडी आदिवासीवाडी, रोहिणी, पानवे या गावातील अंगणवाड्यांची परिस्थिती पाहिल्यावर येथे शिक्षणाचा पायाच धोक्यात असल्याचे दिसत आहे.

- अरुण जंगम म्हसळा : शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असणाऱ्या तोंडसुरे, चिखलप, मेंदडी कोळीवाडा, मेंदडी आदिवासीवाडी, रोहिणी, पानवे या गावातील अंगणवाड्यांची परिस्थिती पाहिल्यावर येथे शिक्षणाचा पायाच धोक्यात असल्याचे दिसत आहे. यापैकी काही अंगणवाड्यांना तडे गेले आहेत. चिमुरडी मुले जीव मुठीत घेऊन अक्षरे गिरवित आहेत.म्हसळा तालुक्यातील अनेक अंगणवाड्यांची देखभालीअभावी दुरवस्था झाली आहे.विशेषत: ग्रामीण भागातील अंगणवाड्यांकडे स्थानिक प्रतिनिधींसहित प्रशासनानेही दुर्लक्ष केल्याने असे घडते आहे.पावसाळ्यात अनेक अंगणवाड्यांच्या शेड व छतासाठी बसविलेल्या पत्र्यांमधून पाणी पडत असल्याने अंगणवाडीमध्ये येणाºया अनेक छोट्या बालकांची गैरसोय होत आहे.मात्र या सर्व गोष्टींकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे.म्हसळा तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक अंगणवाड्यांच्या इमारती खूप जुन्या व जीर्ण झाल्या आहेत.विशेषत: मेंदडी गावातील कोळीवाडा व आदिवासीवाडीवरील इमारती धोकादायक असल्याचे चित्र आहे.तालुक्यातील ग्रामीण भागातील तोंडसुरे या गावातील अंगणवाडीची इमारतच कोसळली असल्याने पर्यायी म्हणून ज्या गावातील घरामध्ये बसविले जाते ते पाहिल्यावर खरोखरच सुरक्षित आहे की नाही अशी कल्पना येते. परंतु शासनाच्या उदासीन धोरणामुळे दुरुस्तीचे अथवा पुनर्बांधणीचे सर्व प्रस्ताव अद्यापही धूळखात पडले आहेत.त्यामुळे या मुलांना बसण्यासाठीही व्यवस्थित जागा नाही. अंगणवाडी सेविका व बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी एक वर्षापूर्वीच दुरुस्तीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे तसेच सदर ग्रामपंचायतीला देवून सुद्धा कोणत्याही प्रकारची कारवाई अद्याप झालेली नाही.इमारतीची दुरुस्ती व नव्याने उभारण्याची मागणी होत असताना स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायत याकडे डोळेझाक करीत असल्याचे दिसत आहे.मुख्य पर्यवेक्षिका तसेच बालविकास विस्तार अधिकारी यांनी अनेक वेळा संबंधित धोकादायक अंगणवाड्या असलेल्या ग्रामपंचायतींकडे अनेक वेळा पत्रव्यवहार केला आहे, तसेच अंगणवाड्यांमध्ये वीज जोडणीसाठीही प्रश्न उपस्थित केले आहेत, परंतु याकडे कोणीही गांभीर्याने विचार करीत नाही.याबाबत प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी रेणुका पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी अंगणवाडीच्या इमारतीत मुलांना बसवू नये, असा आदेश दिला आहे. ही इमारत दुरुस्त करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे. त्यांच्या स्तरावर याबाबत कारवाई व्हावी, असे त्यांनी सांगितले.>बालकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने येणाºया मासिक सभेमध्ये याच विषयावर पाठपुरावा करून मंजुरी आणणार आहोत.-मधुकर गायकर, उपसभापती पंचायत समिती म्हसळा>अंगणवाड्यांमधील सेविकांना अतिवृष्टीमध्ये मुलांना सदर इमारतीमध्ये न बसविण्याचे आदेश दिले. गेल्या दोन वर्षांपासून नवीन इमारत बांधणीसाठी प्रस्ताव पाठवला मंजुरी मिळालेली नाही.-रेणुका पाटील, मुख्य पर्यवेक्षिका तसेच प्रभारी बालविकास प्रकल्प अधिकारी>सदर धोकादायक अंगणवाड्यांचे प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आले असून सदर बाबतीत पाठपुरावा सुरूआहे.प्रस्तावास मंजुरी मिळाल्यास तत्काळ काम सुरू करण्यात येईल.- वाय.एम.प्रभे, गटविकास अधिकारी, म्हसळा पंचायत समिती>मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सदर प्रकरणांना मंजुरी देण्यात येईल.-अदिती तटकरे, जि.प.अध्यक्षा अलिबाग