व्यापा-यांना लुटणा-या सात जणांना ४८ तासांत केली अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 01:21 AM2017-12-21T01:21:43+5:302017-12-21T01:21:53+5:30
कर्जत - कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर गाडी आडवी घालून लुटण्याचा प्रयत्न केल्यानंतर नेरळ पोलिसांनी गुन्हा दाखल होताच तपास सुरू केला होता. अवघ्या ४८ तासांत सात लुटारूंना ताब्यात घेतले असून आणखी काही तरु णांचा शोध नेरळ पोलिसांचे पथक घेत आहे.
कर्जत : कर्जत - कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर गाडी आडवी घालून लुटण्याचा प्रयत्न केल्यानंतर नेरळ पोलिसांनी गुन्हा दाखल होताच तपास सुरू केला होता. अवघ्या ४८ तासांत सात लुटारूंना ताब्यात घेतले असून आणखी काही तरु णांचा शोध नेरळ पोलिसांचे पथक घेत आहे.
पनवेल येथील व्यापारी दर शनिवारी बदलापूरपासून कर्जत आणि खोपोलीपर्यंत दिलेल्या घाऊक मालाची वसुली करण्यासाठी येत असतात. पनवेल करंजाडे येथील सद्दीक खान हे आपल्या अन्य चार सहकारी व्यापारी मित्रांसह या भागात आले होते. त्याची माहिती गाड्या लुटणाºया टोळीला असल्याने सायंकाळी साडेसात वाजता त्यांची एमएच ४६ एन ११०५ ही कार नेरळ येथून कर्जत रस्त्याने जात होती. पंचवटी भागात असताना त्यांच्या कारच्या समोर तवेरा गाडी आडवी आणून उभी करण्यात आली. तीन दुचाकी देखील मागे येऊन उभ्या राहिल्या. त्या चार गाड्यांमधून आलेल्या लुटारूंनी प्रथम गाडीच्या काचा फोडून त्यापैकी एकाने गाडी ताब्यात घेतली आणि ५-६ किलोमीटर लांब जंगलात नेली. तेथे त्या व्यापाºयांना मारहाण करून शस्त्रांचा धाक दाखवून त्यांच्याकडे असलेल्या पैशाची मागणी केली. लूटमार व त्यांच्याबरोबर झालेल्या झटापटीत व्यापारी सद्दीक खान आणि आलोक सिंग हे जखमी देखील झाले. त्यांच्याकडे असलेले मोबाइल फोन, रोख रक्कम, दोघांच्या अंगावर घातलेली जीन्स पॅन्ट काढून घेत त्यांच्या गाडीसह तेथून पलायन केले. जंगलातून रस्ता शोधत ते व्यापारी साडेदहा वाजता नेरळ पोलीस ठाण्यात पोहचले. नेरळ पोलिसांच्या पथकाने रात्री लूटमार करणाºया टोळीमधील सात जणांना पकडून आणले. लूटमार करणारे स्थानिक असल्याने पोलीस देखील चक्रावून गेले आहेत. अंबरनाथ, कर्जत तालुक्यातील हालीवली, शिरसे, पोसरी, बारणे, पेण तालुक्यातील कामार्ली येथील हे सर्व लूटमार करणारे आहेत. या सर्व सात जणांवर गुन्हा दाखल असून पोलीस उपनिरीक्षक शेंगडे अधिक तपास करीत आहेत.