घरफोड्या करणारे सराईत सात गुन्हेगार गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 04:19 AM2018-08-30T04:19:13+5:302018-08-30T04:19:35+5:30
सात लाखांचा ऐवज जप्त : गुजरात, मुंबई, ठाणे जिल्ह्यातही गुन्हे
कल्याण : गुजरात, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी घरफोड्या केल्याप्रकरणी सात गुन्हेगारांना महात्मा फुले चौक पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून २२ मोबाइल, तीन लॅपटॉप, दोन टीव्ही, दोन संगणक, एक पिकअप गाडी, असा सहा लाख ८४ हजार ५२२ रुपयांचा ऐवज हस्तगत केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश लोंढे यांनी पत्रकार परिषदेत दिली. आरोपींकडून दहापेक्षा जास्त गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे.
सोनू राजकुमार गौतम (१९), राकेश रामचंद्र राजभर (३२), संदीप धनिकलाल साहू (२२), जितेश ऊर्फ जितू शशी दुसगे (३९), राजेश रामचंद्र राजभर (२८), छोटेलाल बिपेती शर्मा (४२), रामकिशन यादव अशी आरोपींची नावे आहेत. ते नालासोपारा, दहिसर आणि घोडबंदर परिसरांतील रहिवासी आहेत. कल्याण पश्चिमेतील खडकपाडा परिसरात राहणाऱ्या दत्ता थोरात यांच्या घरी २० जुलैला चोरी झाली होती. याप्रकरणी त्यांनी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार, सहायक पोलीस निरीक्षक एस.डी. डांबरे यांनी तांत्रिक बाबी आणि सीसीटीव्ही फुटेजद्वारे संशयिताला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने अन्य सहकाºयांची नावे सांगितली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धरणे, सहायक पोलीस निरीक्षक एस.डी. डांबरे यांच्या पथकाने इतर आरोपींचा शोध घेत त्यांना अटक केली.
घरफोडीसाठी चोरलेल्या गाडीचा वापर
च्रात्रीच्या वेळी बंद दुकाने अथवा घरे बघून हे आरोपी तेथे चोरी करत. घरफोडी करण्यासाठी चोरलेल्या गाडीचा ते वापर करत असत. तेथे गुन्हा केल्यानंतर गाडी तेथेच सोडून दुसºया ठिकाणी गुन्हा करत. आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांनी विविध गुन्ह्यांत शिक्षाही भोगली आहे, अशी माहिती लोंढे यांनी दिली.