रायगडमध्ये गंभीर स्वरूपाचे दिवसाला सात ते आठ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2021 12:29 AM2021-01-06T00:29:03+5:302021-01-06T00:29:08+5:30

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण सध्या कमी 

Seven to eight critically ill patients a day in Raigad | रायगडमध्ये गंभीर स्वरूपाचे दिवसाला सात ते आठ रुग्ण

रायगडमध्ये गंभीर स्वरूपाचे दिवसाला सात ते आठ रुग्ण

Next

निखिल म्हात्रे
लोकमत न्यूज नेटवर्क 
अलिबाग :  कोरोना विषाणूची दुसरी लाट रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाला काही प्रमाणात यश आले असले, तरी दमा, हायपर टेन्शन, हृदय विकाराच्या आजारांनी डोके वर काढले आहे. दिवसाला सात ते आठ गंभीर स्वरूपाचे रुग्ण उपचार करून घेण्यासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल होत आहेत. कोरोनाबाधित रुग्णांचे प्रमाण सध्या कमी झाले आहे.


    ताणतणाव, चुकीचा आहार आणि आरामदायी जीवनशैली यांच्यामुळे आज समाजात हृदयविकाराची समस्या झपाट्याने वाढत चालली आहे. आजारातून बरे होण्यासाठी रुग्णाला काही माहिती देणे ही प्राथमिक अवस्था असली, तरी चुकीची माहिती देणे किंवा अनावश्यक माहिती फार मोठ्या प्रमाणावर देण्यातून रुग्णाचे नुकसानच अधिक होऊ शकते. विशेषतः सध्याच्या परिस्थितीत, कोरोना साथीच्या निमित्ताने कोणती औषधे घ्यावीत, रोग कसा टाळावा, त्याची लक्षणे अशा माहितीची देवाण-घेवाण प्रचंड प्रमाणात होत आहे. अशा प्रसंगी, हृदयविकाराची खरी लक्षणे ओळखणे, उच्च रक्तदाबाचा धोका कोणता आणि त्यामध्ये कोरोनाचा संबंध कसा येतो, याविषयी खरी माहिती रुग्णांना मिळणे आवश्यक आहे. सततच्या बदलत्या हवामानामुळे थंडी-तापासह घसादुखी आणि खोकला यांची तक्रार करणाऱ्या रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसते. हे आजार गंभीर नसले, तरी याकडे दुर्लक्ष केल्याने त्यांची लागण इतरांनाही होऊन रुग्णांमध्ये वाढ होण्याची भीती असल्याचे डॉक्टर सांगतात. 

यंदा हवामान बदलामुळे वाढली रोगराई 
यंदा हवामानाच्या या बदलत्या वेळापत्रकामुळे रोगराई वाढली आहे. घसादुखी, खोकला यांसारखे आजार सामान्य असल्याने घाबरून जाऊ नये. मात्र, केवळ घरगुती उपायांवर अवलंबून न राहता, गांभीर्य ओळखून वैद्यकीय सल्ला घेतल्यास आजार आटोक्यात येतो, अशी प्रतिक्रिया जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डाॅ.राजीव तंबाळे यांनी दिली आहे.

Web Title: Seven to eight critically ill patients a day in Raigad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.