कुटुंबाला वाळीत टाकणाऱ्या सात जणांविरुद्ध महाडमध्ये गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 02:32 AM2018-03-23T02:32:13+5:302018-03-23T02:32:13+5:30
स्वत:च्या जागेत असलेल्या मंदिराच्या जीर्णोध्दारास विरोध करणाºया कुटुंबाला वाळीत टाकल्याप्रकरणी औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाड तालुक्यातील शेल या गावात हा प्रकार घडला आहे.
महाड : स्वत:च्या जागेत असलेल्या मंदिराच्या जीर्णोध्दारास विरोध करणाºया कुटुंबाला वाळीत टाकल्याप्रकरणी औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाड तालुक्यातील शेल या गावात हा प्रकार घडला आहे.
फिर्यादी गणेश आंब्रे यांनी त्यांच्या जागेमध्ये असलेल्या मंदिराचा जीर्णोध्दार करण्यास विरोध केला होता. त्याचा राग मनात धरून संतोष बबन आंब्रे, गणपत शंकर कदम, बळीराम काशिराम पवार, सचिन महादेव बावळेकर, लक्ष्मण बाळू पवार, सुनील बाळू कदम आणि संजय सखाराम बावळेकर (सर्व रा. शेल,पो. कांबळे, बिरवाडी, ता. महाड) यांनी गणेश आंब्रे यांच्या कुटुंबावर २०१४ पासून सामाजिक बहिष्कार टाकून वाळीत टाकले. या प्रकरणी महाड औद्योगिक वसाहत पोलिसांनी या सात जणांविरोधात महाराष्ट्र सामाजिक बहिष्कृतापासून व्यक्तीचे संरक्षण प्रतिबंध, बंदी व निवारण अधिनियम २०१६ चे कलम ५,६, ७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक एम. एन. म्हस्के हे करीत आहेत.