शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीच्या या कृत्याला जनता माफ करणार नाही; PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"देशाचे सहकार मंत्री कारखाने बुडवणाऱ्यांच्या प्रचाराला..."; जयंत पाटलांचा अमित शाहांना खोचक टोला
3
"पाकिस्तानचा अजेंडा देशात वाढवू नका"; पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीला इशारा
4
"...तोपर्यंत राजकारण करत राहीन"; निवृत्तीच्या चर्चांवर शरद पवारांचं मोठं विधान
5
लेकीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रणवीर-दीपिका झाले स्पॉट, लेक दुआचीही दिसली झलक, पाहा व्हिडिओ
6
Chhagan Bhujbal मला आधीच क्लीनचीट मिळालेय, पुन्हा तुरुंगात जाण्याची भीती नाही; छगन भुजबळांकडून आरोपांचा इन्कार
7
Fact Check:डोनाल्ड ट्रम्प यांच्या भाषणात PM मोदींच्या नावाची घोषणाबाजी झाल्याचा दावा खोटा
8
आता याचं काय करायचं? KL राहुल विचित्र पद्धतीने झाला बोल्ड; चाहत्यांनी लावला डोक्यालाच हात
9
अजित पवारांचे सूर बदलले, बटेंगे तो कटेंगेला थेट उत्तर; बारामतीत मला कुणाची सभा नको
10
स्वामीभक्त शंकर महाराज यांचे मद्यपान, धूम्रपान हे फक्त बाह्यरूप; पहा त्यांचे अंतरंग!
11
उर्फी जावेदने उडवली तृप्ती डिमरीच्या डान्सची खिल्ली, म्हणाली, "इतकी छान अभिनेत्री पण..."
12
अनिल अंबानींना मोठा झटका, रिलायन्स पॉवरचे शेअर्स आपटले; ३ वर्षांच्या बॅननं वाढवलं टेन्शन
13
जम्मू-काश्मीर विधानसभेत पुन्हा गदारोळ, भाजप आणि एनसी आमदारांमध्ये खडाजंगी
14
जान्हवी कपूर पोहोचली हैदराबादच्या अंजनेय स्वामी मंदिरात, अर्धा तास केली विधीवत पूजा
15
विजय वडेट्टीवार यांच्या नामनिर्देशनपत्राला हायकोर्टात आव्हान, आज सुनावणी होणार
16
Ola ची शानदार ऑफर, Ather आणि TVS चं वाढलं टेन्शन; 15 हजार रुपये मिळतेय स्वस्त!
17
मावळमध्ये सुनील शेळकेंच्या अडचणींत भर; आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
18
"आधी मोदी-शाह-अदाणी यांना साफ करा"; संजय राऊतांचे राज ठाकरेंना आव्हान
19
राहुल गांधीच्या संविधान सन्मान कार्यक्रमाकडे ओबीसी संघटनांनी फिरवली पाठ!
20
"ईडीपासून सुटकेसाठी भाजपसोबत आलो"; भुजबळांच्या नावाने पुस्तकात दावा, राजकीय वर्तुळात चर्चा

सातबारा अद्ययावत कार्यक्रमामुळे तलाठी गावातून गायब, सर्व्हर मंद असल्याने अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 3:53 AM

संपूर्ण राज्यात सुरू असलेल्या सातबारा अद्ययावत कार्यक्रमामुळे तलाठी महाड शहरात एकाच ठिकाणी बसत असल्याने ग्रामीण भागातून तलाठी गायब झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. गेल्या चार वर्षांपासून हे काम सुरू असून अद्याप हे काम पूर्ण न झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत.

दासगाव : संपूर्ण राज्यात सुरू असलेल्या सातबारा अद्ययावत कार्यक्रमामुळे तलाठी महाड शहरात एकाच ठिकाणी बसत असल्याने ग्रामीण भागातून तलाठी गायब झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. गेल्या चार वर्षांपासून हे काम सुरू असून अद्याप हे काम पूर्ण न झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. मात्र इंटरनेट आणि दूरध्वनी सुविधा नसल्याने तालुक्यातील अनेक कार्यालये उघडलीच गेली नाहीत. याचा फटका मात्र सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. एकीकडे हा कार्यक्र म शासनाला पूर्ण करावयाचा आहे तर दुसरीकडे याचे संगणकीय सर्व्हर मंदावत आहे यामुळे सातबारा अद्ययावत करण्यास वेळ जात आहे, शिवाय कर्मचारी तुटवडा असल्याने याचा फटका देखील नागरिकांना बसत आहे.महाड तालुक्यात सातबारा अद्ययावत करणे कार्यक्र म गेली दोन वर्षांपासून सुरू आहे. शहरातील माता रमाबाई विहार याठिकाणी सर्व तलाठी कर्मचाºयांना एकत्रित बसवले आहे. याठिकाणी नेट सुविधा उपलब्ध करून दिली असल्याने जवळपास २६ तलाठी याठिकाणी काम करत आहेत. यामध्ये ६ मंडळ अधिकाºयांचा देखील समावेश आहे. आॅनलाइन सातबारा अपग्रेड करणे, रीएडिट करणे अशी कामे यावर केली जात आहेत. महाड तालुक्यातील ३६ तलाठी सजा आहेत त्यापैकी २६ तलाठी काम करत आहेत. दिवसभर हे काम सुरु असल्याने आणि शासनाचे आदेश असल्याने प्रत्यक्ष तलाठी कार्यालयात काम करणे या कर्मचाºयांना शक्य नाही. शिवाय या कार्यालयातील सर्व कोतवाल देखील याठिकाणी नेमण्यात आले आहेत. यामुळे तालुक्यातील अनेक गावातील तलाठी कार्यालये ओस पडली आहेत. यामुळे ग्रामीण भागातील ग्रामस्थांना पैसे आणि वेळ वाया घालवत महाडमध्ये दाखल्यांसाठी यावे लागत आहे. महाड तालुक्यातील अनेक गावे ही दुर्गम भागात आहेत. त्या ठिकाणाहून महाडमध्ये यायचे तर पैसे आणि वेळ वाया घालवावा लागत आहे. काही तलाठी त्यांच्या सजेमध्ये काही वेळ काम करून पुन्हा महाडमध्ये सातबारा दुरु स्ती कार्यक्र माच्या ठिकाणी येत आहेत. मात्र अन्य शहरातून कामासाठी येणाºया नागरिकांना यामुळे फेºया माराव्या लागत आहेत.तलाठी कार्यालये दुर्गम भागात असल्याने नेट सुविधा नाही. अनेक कार्यालयांना तर वीज पुरवठा देखील नाही. यामुळे या कार्यालयात संगणकीय काम होत नाही. सध्या महसूल संदर्भातील सर्व कामे आॅनलाइन होत आहेत. यामुळे तलाठी कार्यालये बंद ठेवली जात आहेत. त्यातच कमी तलाठी कर्मचारी आणि गावांची संख्या अधिक यामुळे एका तलाठ्याकडे किमान दोन ते तीन गावांचा कारभार दिला आहे. कोंझर गावातील तलाठी कार्यालय तर गेली दोन वर्षे बंद अवस्थेत आहे.संके तस्थळ मंद : गावातून ना नेट सुविधा ना दूरध्वनी यामुळे सातबारा अद्ययावत काम शहरात एकाच ठिकाणी होत आहे. याकरिता शासन या तलाठी कर्मचाºयाने प्रतिदिन किती काम केले आहे, याचा आॅनलाइन अहवाल तपासत आहे. मात्र याठिकाणी ज्या वेबवर हे काम केले जात आहे ते संकेतस्थळ कायम मंदावत आहे. यामुळे तलाठी कर्मचाºयाला एक सातबारा अपडेट करण्यासाठी दिवस जात आहे. संपूर्ण जिल्ह्याला आणि राज्याला एकच सर्व्हर असल्याने ही स्थिती आहे. हे काम डिसेंबर पूर्वी पूर्ण करावयाचे आहे मात्र सतत उद्भवत असलेल्या नेट समस्येमुळे हे काम लांबत आहे.महाडमध्ये १८३ गावे आहेत. त्यापैकी ३५ गावांची सातबारा दुरु स्ती पूर्ण झाली आहे. आॅनलाइन कामासाठी इंटरनेट सुविधा, सर्व्हरमध्ये निर्माण होणारे अडथळे यामुळे जलद गतीने सातबाºयामध्येदुरु स्ती शक्य नाही. -प्रदीप कु डाळ, निवासी नायब तहसीलदार

टॅग्स :Raigadरायगड