रायगडमधील सात तालुक्यांत महिला मतदार आघाडीवर
By admin | Published: February 22, 2017 04:47 AM2017-02-22T04:47:06+5:302017-02-22T04:47:06+5:30
मतदानाचा पवित्र हक्क बजावण्याकरिता घरातून बाहेर पडून, रायगडमधील १५ तालुक्यांपैकी ७ तालुक्यांत महिलांनी
अलिबाग : मतदानाचा पवित्र हक्क बजावण्याकरिता घरातून बाहेर पडून, रायगडमधील १५ तालुक्यांपैकी ७ तालुक्यांत महिलांनी मतदानात आघाडी घेतली. यातून लोकशाहीचे सक्षमीकरण अखेर आम्हालाच करायचे आहे, असा सुप्त संकेतच दिल्याचे दिसून आले. मंगळवारी रायगडच्या ग्रामीण भागात विविध मतदान केंद्रांवर ज्या रांगा दिसून आल्या, त्यामध्ये महिलांचे प्रमाण अधिक होते.
दुपारी ३.३० पर्यंत झालेल्या मतदानात अलिबाग, पेण, मुरुड, तळा, पोलादपूर, म्हसळा आणि श्रीवर्धन या सात तालुक्यांत झालेल्या मतदानात महिला मतदारांचे प्रमाण पुरुष मतदारांपेक्षा अधिक होते. अंतिम मतदानातदेखील हेच प्रमाण कायम राहील, असा अंदाज निवडणूक यंत्रणेचा आहे.
गेल्या १० ते १५ दिवसांपासून जिल्ह्यातील गावा-गावांत विविध उपक्रमांच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या मतदार जागृती अभियानाचा हा परिणाम असल्याचे संबंधित तालुक्यांतील निवडणूक यंत्रणा प्रमुख आणि काही राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. (प्रतिनिधी)