विनोद भोईरराबगाव/पाली : पाली-खोपोली या राज्य महामार्गाच्या दुपदरीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. या महामार्गालगत असलेल्या शेतक-यांच्या दुबार पिकी शेतजमिनी संपादित करण्यात आल्या. त्यासाठी कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नाही. याविरोधात सुधागड शेतकरी समन्वय संघर्ष समितीने अनेक आंदोलन व उपोषण केली; परंतु कोणती कार्यवाही झाली नाही. त्यामुळे येथील शेतकºयांनी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांना साकडे घातले आहे. पवार एका कार्यक्रमासाठी पाली येथे आले असता, शेतकरी संघर्ष समितीच्या पदाधिकाºयांनी त्यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन दिले.शेतकरी हा लाखांचा पोशिंदा आहे. तो जगलाच पाहिजे व ग्रामीण भागांचा विकासही झाला पाहिजे. यासाठी स्थानिक प्रशासन व एमएसआरडीसीने महामार्ग बाधित शेतकºयांना विश्वासात घेऊन संपादित होणाºया जमिनीचा योग्य मोबदला देऊनच कामाला सुरुवात करावी. शेतकºयावरील अन्याय खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा पवार यांनी या वेळी दिला.बाधित शेतकºयांनी पाली तहसील कार्यालयाच्या आवारात १९ डिसेंबरपासून सुरू केलेले उपोषण चौथ्या दिवशी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या यशस्वी मध्यस्थीने स्थगित करण्यात आले. शरद पवार आंदोलनकर्त्या शेतकºयांची भेट घेऊन चर्चा करतील, असे आश्वासन तटकरे यांनी या वेळी दिले होते. त्यानुसार सोमवारी पवार यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.या वेळी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रमोद मोरे, उपाध्यक्ष चंद्रकांत शिंदे, गजानन माळी, रवींद्रनाथ ओव्हाळ, गिरीश काटकर, सचिन तेलंगे,संतोष झोरकर, संतोष जगताप, सचिन तेलंगे आदी पदाधिकारी उपस्थित होते.>वाकण-खोपोली महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीबरोबर चर्चा करताना खा. शरद पवार, आ. सुनील तटकरे व समितीचे अध्यक्ष प्रमोद मोरे व पदाधिकारी दिसत आहेत.
महामार्ग बाधित शेतक-यांचे शरद पवार यांना साकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 3:01 AM