अलिबाग : पक्षाची भूमिका मांडण्याचा अधिकार हा जितेंद्र आव्हाड यांना आहे. आव्हाड यांना काय बोलावे हे दुसऱ्यांनी शहाणपणा शिकवू नये. धनंजय मुंडे पक्षात येण्या आधीपासून आव्हाड हे पक्षाचे काम करीत आहेत. असे खुद्द शरद पवार यांनी म्हटले आहे. त्यामुळे पवार यांच्या उत्तराने सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. मी कधीही पवारांना विचारून बोलत नाही आजही नाही. असे उत्तर धनंजय मुंडे यांच्या टीकेला आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिले आहे.
मी पक्षाच्या कक्षेच्या बाहेर जाऊन बोलतो हे शक्य नाही. जो कोणी शरद पवार, सुप्रिया सुळे आणि पक्षावर बोलेल त्यांना कोणीही असो सोडणार नाही असा इशाराही जितेंद्र आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना विरोधकांना दिला आहे. अलिबाग जिल्हा न्यायालयात एका केस संदर्भात शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे शनिवारी १७ फेब्रुवारी रोजी हजर होते. यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलेल्या टीकेला आव्हाड यांनी उत्तर दिले आहे.
पवार कुटुंबात जितेंद्र आव्हाड यांनी भांडण लावल्याने काका, पुतणे दुरावा निर्माण होऊन घर फुटले असा आरोप कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी आव्हाड यांच्यावर केला आहे. आमदार आव्हाड यांनी मुंडे यांच्या आरोपाला सडेतोड उत्तर दिले आहे. शरद पवार यांनीच मला पक्षाची भूमिका मांडण्याचा अधिकार दिला आहे. त्यामुळे इतरांनी शहणपण आव्हाड यांना शिकवू नका असे शरद पवार यांनीच म्हटले असल्याचे आमदार आव्हाड यांनी म्हंटले आहे. पवार, सुळे आणि पक्षावर टीका केलीत तर सोडणार नाही असा इशाराही आव्हाड यांनी दिला आहे.