राजेश भोस्तेकर, लोकमत न्युज नेटवर्क , अलिबाग : महाराष्ट्रातील सार्वजनिक जीवनामध्ये कष्ट करून प्रसंगी संघर्ष करून आयुष्यात ३५ वर्ष ठसा उमटवला अशी यादी केली तर ती मीनाक्षी पाटील यांची आहे. त्यांचा परिवार हा पुरोगामी विचारांचा आहे. पाटील कुटुंबांनी आजही आपली विचारसरणी बदलली नाही आहे. मीनाक्षी पाटील यांचे विधानसभेतील कामकाज लोकांच्या लक्षात राहिले आहे. रायगडच्या विकासाचे प्रश्न त्यांनी गांभीर्याने मांडले. प्रकृती अस्वस्थ असतानाही त्याचा आत्मविश्वास कमी झाला नव्हता. या काळात दोन वेळा भेट झाली प्रकृती ठीक नसली तरी त्याचे विचार ठीक होते. एक चांगल्या व्यक्तीला महाराष्ट्र मुकला आहे माझ्या परिवारातर्फे त्यांना श्रद्धांजली वाहत आहे. अशी भावनिक प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली आहे.
माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांचे शुक्रवारी दुर्धर आजाराने निधन झाले. त्याच्या निधनामुळे पाटील परिवारावर शोककळा पसरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्याच्या पत्नी प्रतिभा पवार यांनी पेझारी येथे पाटील कुटुंबीयांची सात्वनपर भेट घेऊन मीनाक्षी पाटील यांना आदरांजली वाहिली. आमदार जयंत पाटील, माजी आमदार पंडित पाटील , आस्वाद पाटील यांची भेट घेऊन त्यांचे सात्वन केले. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील हे सुध्दा उपस्थित होते.
संघर्ष करणाऱ्या एका चांगल्या व्यक्तीला महाराष्ट्र मुकला असल्याची यावेळी शरद पवार यांनी प्रतिक्रिया देऊन पवार कुटुंबीय पाटील कुटुंबाच्या दुःखात सहभागी असल्याचे म्हटले आहे.