वाशिम जिल्ह्यात सोशल मीडियात अफवांचे शेअरिंग

By admin | Published: July 28, 2014 01:42 AM2014-07-28T01:42:26+5:302014-07-28T01:52:02+5:30

व्हॉट्स अँपवर ईलता वाढली: अफवा ठरताहेत सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी.

Sharing rumors in social media in Washim district | वाशिम जिल्ह्यात सोशल मीडियात अफवांचे शेअरिंग

वाशिम जिल्ह्यात सोशल मीडियात अफवांचे शेअरिंग

Next

नागेश घोपे / वाशिम
परस्परांशी अगदी सहज अँक्सेस होणार्‍या व्हॉट्स अँपने सद्य:स्थितीत तरुणाईला भुरळ घातले आहे. मात्र, एकमेकांशी संवाद साधण्यापेक्षा यावर अफवांच्या शेअरिंगलाच कमालीचा ऊत आला आहे. परिणामी डोकेदुखी वाढली आहे.
अँड्राईड मोबाईल फोनमुळे आजमितीला सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. फेसबुकची क्रेझ काहीशी कमी होते ना होते तोच व्हॉट्स अँपने तरुणाईला कवेत घेतले आहे. संवादाच्या या नव्या तंत्राचा अनेकांना मोठा फायदा होत असला तरी, सध्या वाट चुकलेल्या काही वापरकर्त्यांनी या जादूच्या कांडीचा वापर चुकीच्या कामांसाठी चालविला आहे. योग्य प्रसंगावधान साधून एखादी अफवा व्हॉट्स अँपवर शेअर केली जाते. अल्पावधीतच या अफवांचा वायुवेगाने प्रसार होतो आणि नंतर सुरू होते ती सामान्यांची त्रेधातिरपीट. सिनेअभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या अपघाताची अफवा असो अथवा या दोन दिवसातच व्हॉट्स अँपवर झळकलेल्या नारायण राणे यांच्या मनसे प्रवेशाच्या वार्तेने सर्व लोकांचे डोके चक्रावून टाकले होते, हे निश्‍चित. लोकसभा निवडणुकीच्या वेळी तर परस्परांविरोधात लढणार्‍यांच्या पाठिंब्याच्या सोशल मीडियावरील अफवांनी चांगलाच रंग आणला होता.
*पालकांनो जागरूक व्हा !
व्हॉट्स अँप व फेसबुक या सोशल मीडियातील अप्लिकेशनचा वापर मुलेच करतात असे नाही. मुलीही ही अप्लिकेशन हाताळत आहेत. त्यांचेही ग्रुप आहेत; पण या ग्रुपमध्ये नेमक ी कशाची देवाण-घेवाण केली जाते, हे पाहिले असता त्याही मुलांपेक्षा वेगळे काही करीत नाहीत हेच दिसून आले. त्यामुळे आता पालकांनी जागृत होण्याची वेळ आली आहे. आपला मुलगा अथवा मुलगी हातातील मोबाईल सोडतच नसेल, तर पालकांनी त्यांची चौकशी करावी तरच याला आळा बसेल.
*सावधानता बाळगणे गरजेचे
फेसबुकचा वापर करताना युर्जसने दक्षता घेणे गरजेचे आहे. फेसबुक वापरताना कुणालाच आपला पासवर्ड तथा अन्य खासगी माहिती देऊ नये. एवढेच नव्हे तर पासवर्ड हा अत्यंत क्लिष्ट ठेवावा जेणेकरून सहज कुणालाही तुमचे अकाऊंट वापरणे शक्य होणार नाही. व्हॉट्स अँप वापरताना आपल्याला आलेला प्रत्येक संदेश दुसर्‍यांना पोस्ट करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचून घ्या. कुणी अफवा पसरवित असेल, तर त्याला दाद देऊ नका म्हणजे या कृत्याला पायबंद घातल्या जाईल.

Web Title: Sharing rumors in social media in Washim district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.