Grampanchayat Result: शिंदे गटाच्या भरत गोगावलेंना 'दे धक्का', गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2022 11:43 AM2022-10-17T11:43:39+5:302022-10-17T12:00:45+5:30

भरत गोगावले यांच्या रायगड जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावची म्हणजेच काळीज खरवली ग्रामपंचायत महविकास आघाडीकडे गेली आहे.

Shinde group's Bharat shocked the people of Goga, defeated in the village's village grampanchayat election | Grampanchayat Result: शिंदे गटाच्या भरत गोगावलेंना 'दे धक्का', गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव

Grampanchayat Result: शिंदे गटाच्या भरत गोगावलेंना 'दे धक्का', गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव

googlenewsNext

रायगड/मुंबई - राज्यातील 1079 ग्रामपंचायतींवर कुणाचा झेंडा फडकणार याचा निर्णय आज लागणार आहे. 18 जिल्ह्यातील 1 हजार 166  ग्रामपंचायतींपैकी 87 जागा बिनविरोध निवडून आल्यात. त्यामुळे 1 हजार 79 जागांसाठी रविवारी मतदान पार पडलं. याच निवडणुकांचा निकाल लागण्यास सुरुवात झाली असून भाजप-शिंदेगट आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांचे वर्चस्व पणाला लागले आहे. निवडणूक निकालाला सकाळपासूनच सुरूवात झाली आहे. शिंदे गटाचे नेते आमदार भरत गोगवाले यांना ग्रामस्थांनी धक्का दिलाय. 

भरत गोगावले यांच्या रायगड जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावची म्हणजेच काळीज खरवली ग्रामपंचायत महाविकास आघाडीकडे गेली आहे. येथे शिंदे गटाच्या सरपंचपदाच्या उमदेवाराचा पराभव झाला. काँग्रेस समर्थक चैतन्य महामुनकर हे विजयी झाले आहेत. त्यामुळे, शिंदे गटाला हा धक्का मानला जातो. कारण भरत गोगवले हे सध्या शिंदे गटातील आघाडीचे नेते असून विधानसभेत शिवसेना शिंदे गटाचे प्रतोदही आहेत. शिवसेनेतील दोन गटातील चिन्ह आणि नावाच्या संघर्षानंतर होत असलेल्या या निवडणुकांच्या निकालाकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.  

खरवली काळीज ग्रामपंचायतीत एकूण 13 सदस्य 1 सरपंच एकूण 14 उमेदवार विजयी झाले आहेत. सरपंच पदासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार चैतन्य उर्फ बाबू महामुनकर विजय झाले. बाळासाहेबांची शिवसेना उमेदवार समीर महामुनकर यांना 1053 तर महाविकास आघाडीचे विजय उमेदवार बाबू , महामुनकर यांना 1176 मते मिळाली. यामध्ये शिवसेनेचे 10 सदस्य महाविकास आघाडीचे 2 सदस्य तर 1 अपक्ष सदस्य निवडून आला आहे. शिंदे गटाचे 10 सदस्य निवडून आले, पण सत्ता महाविकास आघाडीकडे गेली. कारण, जनतेतून सरपंच निवड असल्याने शिंदे गटाला हा फटका बसला आहे.

दरम्यान, आता सरपंचाची निवड थेट जनतेमधून होणार आहे. त्यामुळे, निवडणुकीत दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. नाना पटोले, विजयकुमार गावित, के.सी.पाडवी, उदय सामंत, राजन साळवी, भास्कर जाधव, रामदास कदम, परिणय फुके, कपिल पाटील यांच्यासह बड्या नेत्यांच्या बालेकिल्ल्यात प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 

Web Title: Shinde group's Bharat shocked the people of Goga, defeated in the village's village grampanchayat election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.