घारापुरी बंदराच्या समुद्रात भरकटलेले ‘ते’ जहाज जेएनपीटीच्या अ‍ॅकरपॉइंटमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 11:29 PM2020-08-26T23:29:13+5:302020-08-26T23:29:20+5:30

जेएनपीटी बंदरातून टॅग ऑफशोअर कंपनीचे टॅगनोया हे मालवाहू जहाज मागील काही दिवसांपासून अ‍ॅकरपॉइंट सोडून घारापुरी बंदराच्या समुद्रातील किनाºयाजवळ भरकटले होते.

Ship 'Te' stranded at sea in Gharapuri port at JNPT's Ackerpoint | घारापुरी बंदराच्या समुद्रात भरकटलेले ‘ते’ जहाज जेएनपीटीच्या अ‍ॅकरपॉइंटमध्ये

घारापुरी बंदराच्या समुद्रात भरकटलेले ‘ते’ जहाज जेएनपीटीच्या अ‍ॅकरपॉइंटमध्ये

Next

उरण : जेएनपीटी बंदरातून अ‍ॅकरपॉइंट सोडून घारापुरी बंदराच्या समुद्रातील किनाऱ्याजवळ भरकटलेले टॅगनोया नावाचे मालवाहू जहाज मंगळवारी, २५ ऑगस्ट रोजी जेएनपीटीने पुन्हा बंदराच्या न्हावा बेसजवळील अ‍ॅकरपॉइंटमध्ये आणले आहे.

जेएनपीटी बंदरातून टॅग ऑफशोअर कंपनीचे टॅगनोया हे मालवाहू जहाज मागील काही दिवसांपासून अ‍ॅकरपॉइंट सोडून घारापुरी बंदराच्या समुद्रातील किनाºयाजवळ भरकटले होते. एकही कर्मचारी नसलेल्या भरकटलेल्या या जहाजामुळे मात्र घारापुरी बेटाला समुद्राखालून वीजपुरवठा करणाºया वीज वाहिन्यांना धोका निर्माण झाला होता. घारापुरी ग्रामपंचायतीचे सरपंच बळीराम ठाकूर यांनी याबाबत माहिती देऊन जेएनपीटीचे लक्ष वेधले होते, तसेच याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्तही प्रकाशित झाली होती. वृत्त प्रकाशित होताच, जेएनपीटी बंदर प्रशासनाने तातडीने कारवाई करीत भरकटलेले जहाज मंगळवारी २५ आॅगस्ट रोजी सुरक्षित बंदराच्या न्हावा बेस येथील अ‍ॅकरपॉइंटमध्ये आणले आहे. जहाज पुन्हा अ‍ॅकरपॉइंटमधून बाहेर भरकटणार नाही, याची दक्षता घेतली जाणार असल्याची माहिती जेएनपीटी नियंत्रण कक्षातून देण्यात आली.

Web Title: Ship 'Te' stranded at sea in Gharapuri port at JNPT's Ackerpoint

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.