शिरवली-माणकुले रस्ता पाण्याखाली

By admin | Published: June 27, 2017 03:23 AM2017-06-27T03:23:11+5:302017-06-27T03:23:11+5:30

तालुक्यातील शिरवली-माणकुले रस्त्यावर उधाणाचे खारे पाणी सुमारे दोन फुटांहून अधिक उंचीपर्यंत गेले आहे. त्यामुळे या मार्गावरील

Shirdavali-Manquli road under water | शिरवली-माणकुले रस्ता पाण्याखाली

शिरवली-माणकुले रस्ता पाण्याखाली

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : तालुक्यातील शिरवली-माणकुले रस्त्यावर उधाणाचे खारे पाणी सुमारे दोन फुटांहून अधिक उंचीपर्यंत गेले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. सोमवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास अलिबाग-रोहा मार्गावरील सहाण गावाजवळच्या मोठ्या मोरीलगतचा रस्ता खचल्याने येथे धोकादायक परिस्थिती निर्माण झाली असून वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.
श्रीवर्धन तालुक्यातील बागमांडला-हरिहरेश्वर रस्त्यावर मोठे भगदाड पडून रस्त्याखालील माती वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूकही बंद करावी लागली आहे.
शिरवली-माणकुले रस्त्याकरिता १० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. रस्त्याची उंची दोन ते तीन फूट वाढवून संरक्षण भिंत बांधण्यात येणार आहे, अशी आश्वासने तीन वर्षांपासून दिली जात आहेत.

Web Title: Shirdavali-Manquli road under water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.