लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : तालुक्यातील शिरवली-माणकुले रस्त्यावर उधाणाचे खारे पाणी सुमारे दोन फुटांहून अधिक उंचीपर्यंत गेले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. सोमवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास अलिबाग-रोहा मार्गावरील सहाण गावाजवळच्या मोठ्या मोरीलगतचा रस्ता खचल्याने येथे धोकादायक परिस्थिती निर्माण झाली असून वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.श्रीवर्धन तालुक्यातील बागमांडला-हरिहरेश्वर रस्त्यावर मोठे भगदाड पडून रस्त्याखालील माती वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूकही बंद करावी लागली आहे.शिरवली-माणकुले रस्त्याकरिता १० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. रस्त्याची उंची दोन ते तीन फूट वाढवून संरक्षण भिंत बांधण्यात येणार आहे, अशी आश्वासने तीन वर्षांपासून दिली जात आहेत.
शिरवली-माणकुले रस्ता पाण्याखाली
By admin | Published: June 27, 2017 3:23 AM