शिवसैनिक संतप्त, नारायण राणेंच्या प्रतिमेला काळे फासून निषेध
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 03:22 PM2021-08-24T15:22:24+5:302021-08-24T15:23:30+5:30
Narayan Rane VS Shiv Sena Row : उद्धव साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, जिंदाबाद जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद अशा जोरदार घोषणाबाजी करून राणेंच्या प्रतिमेला काळे फासून व चपलेने बदडुन शिवसैनिकांनी राणे यांच्या वक्तव्याचा निषेध केला.
वडखळ : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल आक्षेपार्ह विधान केलेल्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात पेण येथील कोतवाल चौकात संतप्त शिवसैनिकांनी घोषणाबाजी करून संताप व्यक्त करून निषेध केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रतिमेला संतप्त शिवसैनिकांनी पेणमध्ये काळे फासून चपलेने बदडले. उद्धव साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, जिंदाबाद जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद अशा जोरदार घोषणाबाजी करून राणेंच्या प्रतिमेला काळे फासून व चपलेने बदडुन शिवसैनिकांनी राणे यांच्या वक्तव्याचा निषेध केला.
राणे यांनी केवळ मुख्यमंत्रीपदाचा अपमान केला नसून संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचा अपमान केला आहे. भाजपाने केवळ शिवसेनेवर विष ओकण्याकरिता राणे यांना घेतले असल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला .आता शिवसैनिक पेटून उठला आहे. नारायण राणे यांनी माफी न मागितल्यास त्यांची जन आशीर्वाद यात्रा शिवसैनिक रोखतील असा इशारा तालुकाप्रमुख अविनाश म्हात्रे यांनी दिला. नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे पेणचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, उपविभागीय पोलिस अधिकारी विभा चव्हाण यांच्याकडे करण्यात आली.
यावेळी तालुका प्रमुख अविनाश म्हात्रे, विधानसभा संघटक बाळा म्हात्रे, महिला आघाडीच्या दीपश्री पोटफोडे, उपतालुका प्रमुख भगवान पाटील, संतोष पाटील, शहर प्रमुख सुधाकर म्हात्रे, माजी शहरप्रमुख अशोक वर्तक, वहातुकसेनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप पाटील, जगदिश ठाकुर, नरेश सोनावणे, कांतीलाल म्हात्रे, तुकाराम म्हात्रे, राजश्री घरत, चेतन मोकल, आशिष वर्तक, सुरेश कोळी, अच्युत पाटील, प्रसाद देशमुख, श्रीतेज कदम, विजय पाटील, अजय पाटील, संजय पाटील, भगवान म्हात्रे, विशाल दोशी, ईश्वर शिंदे, नरेश शिंदे, गजानन मोकल, राजू पाटील, लव्हेंद्र मोकल, वंदना पाशिलकर, लकी बोरा, जय पाटील यांच्यासह संतप्त शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.