रायगड: महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि भाजपमध्ये जवळपास दररोज आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. अनेकविध मुद्द्यांवरून दोन्ही पक्ष आमनेसामने येताना दिसत आहेत. रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या दिल्ली दौऱ्यादरम्यान केंद्रीय गृहमंत्री यांची भेट घेतली. यावेळी नक्षलग्रस्त भागाच्या समस्यांबाबतच्या बैठकीलाही उपस्थिती लावली. यानंतर आता शिवसेनेकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर बोचरी टीका करण्यात आली आहे. अमित शाह म्हणजे गजनी आहेत. याउलट, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र रामशास्त्री बाण्याचे नेतृत्व आहे, असे म्हटले आहे. (shiv sena arvind sawant alleged that bjp leader and union home minister amit shah is ghajini)
शिवसेनेचे आनंदराव अडसूळ यांना ईडीचे समन्स; सिटी बँक घोटाळा प्रकरणी हजर राहण्याचे आदेश
शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला असून, यानंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चा आणि तर्क-वितर्कांना सुरुवात झाल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते आणि माजी केंद्रीयमंत्री अनंत गीते यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला होता. मात्र, यानंतर अरविंद सावंत यांनी भाजपवर टीका केली आहे.
“राजसाहेब, भाजपशी युती करा, फायदा होईल”; पुण्यातील मनसे नेत्यांचा दबाव वाढला!
अमित शाह हे गजनी आहेत
मैने ऐसे कोई बोला नहीं था, हा गजनीचा झटका त्यांना येतो. अमित शाह गजनी असतील, पण आमचे मुख्यमंत्री उद्धव मात्र रामशास्त्री बाण्याने काम करणारे आमचे नेतृत्व आहे, हे लक्षात ठेवा, असे अरविंद सावंत यांनी म्हटले आहे. भाजपने शिवसेनेला दिलेला शब्द पाळला नाही, या गोष्टीकडे अरविंद सावंत यांचा रोख होता, असे सांगितले जात आहे.
“आम्हाला पुन्हा सत्तेची संधी मिळणारच आहे, तेव्हा...”: देवेंद्र फडणवीस
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दिल्लीत भेट झाली. केंद्रीय गृह मंत्रालयाची नक्षलग्रस्त राज्यांतील मुख्यमंत्र्याशी दिल्लीत बैठक बोलावली होती. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ही उपस्थित होते. याशिवाय बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आदी उपस्थित होते. तब्बल साडेतीन तास ही बैठक चालली. नक्षलग्रस्त भागात विकासाला गती मिळण्यासाठी केंद्र सरकारने या परिसरात पायाभूत सुविधा उभारण्यासाठी १२०० कोटींच्या निधीची मदत करावी, नक्षल प्रभावित भागांतील रस्ते व पूल बांधकाम प्रकल्पांना मंजुरी मिळावी. या भागातील लोकोपयोगी कामांसाठी वन अधिनियमांतर्गत पुढचे तीन वर्षांसाठी मुदत वाढ मिळावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत केली.