"शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्ववादी विचार आमच्या रक्तात भिनले आहेत"
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 03:13 PM2024-01-23T15:13:21+5:302024-01-23T15:13:48+5:30
बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७व्या जयंतीनिमित्त सरपंच भास्कर मोकल यांनी अर्पण केली आदरांजली
उरण: शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणजे खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे भूषण होते.त्यांचे हिंदुत्ववादी विचार आमच्या रक्तात भिनले असल्याचे प्रतिपादन चिरनेर सरपंच भास्कर मोकल यांनी केले. शिवसेना, युवासेना शाखा चिरनेर व भोम यांच्या वतीने मंगळवारी (२३) जानेवारी रोजी चिरनेर येथील श्रीराम मंदिराच्या सभामंडपात मराठी जन माणसाच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या शिवसेना प्रमुख वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या ९७ व्या जयंती दिनानिमित्ताने मराठी भूमिपुत्रांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी मोकल बोलत होते. शिवसेना प्रमुख देहाने आमच्यात आज जरी नसले तरी त्यांचे परखड व जहाल हिंदुत्ववादी विचार आमच्या रक्तात भिनले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शिवप्रमुखांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना आदरांजली वाहून त्यांच्या कार्याचा आढावा घेतला. दिवसभराच्या भरगच्च कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप, श्री सत्यनारायणाची महापूजा, हरिपाठ आणि सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी उद्धव गटाचे उरण तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, शिवधन पतसंस्थेचे चेअरमन गणेश म्हात्रे, उपसरपंच सचिन घबाडी, शिवसेना शाखाप्रमुख समाधान ठाकूर, शाखाप्रमुख सदानंद पाटील, माजी शाखाप्रमुख सचिन म्हात्रे, पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन गजानन वशेणीकर, माजी उपसरपंच आशिर्वाद ठाकूर, कृषीमित्र प्रफुल्ल खारपाटील, माजी शाखाप्रमुख अरुण ठाकूर, ग्राहक संरक्षण कक्षाचे शशांक ठाकूर, पतसंस्थेचे संचालक दत्तात्रेय म्हात्रे, शिवसेनेच्या ज्योती म्हात्रे, पद्माकर मोकल, अशोक फोफेरकर, गजानन चौलकर, चांगदेव जोशी, हरीश फोफेरकर, श्रीधर पाटील, अरुण वशेणीकर, सुरेश म्हात्रे, ग्रामपंचायतीच्या मृणाली ठाकूर, निकिता नारंगीकर, समुद्रा म्हात्रे, नीलम चौलकर, तसेच अन्य पदाधिकारी मान्यवर, शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.