बिरवाडी ग्रामसभेत गोंधळ, शिवसेना-काँग्रेस कार्यकर्ते भिडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 01:16 AM2019-12-26T01:16:19+5:302019-12-26T01:16:59+5:30

वादविवाद :सत्ताधारी शिवसेना-काँग्रेस कार्यकर्ते भिडले

Shiv Sena-Congress workers get confused in Birwadi Gram Sabha | बिरवाडी ग्रामसभेत गोंधळ, शिवसेना-काँग्रेस कार्यकर्ते भिडले

बिरवाडी ग्रामसभेत गोंधळ, शिवसेना-काँग्रेस कार्यकर्ते भिडले

Next

बिरवाडी : महाड तालुक्यातील श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बिरवाडी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत सत्ताधारी शिवसेना व काँग्रेस कार्यकर्ते समोरासमोर भिडल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. एकंदर परिस्थिती लक्षात घेऊन ग्रामसभा अध्यक्ष शिवाजी तांबे यांनी सभा संपविल्याने पुढील अनर्थ टळल्याचे दिसून आले.

बिरवाडी ग्रामपंचायतीची तहकूब ग्रामसभा २३ डिसेंबर रोजी ग्रामपंचायतीच्या क्रांतीसिंह नानासाहेब पुरोहित सभागृहात सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली होती. या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी शिवाजी तांबे यांची निवड करण्यात आली, त्यानंतर मागील ग्रामसभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करणे, वार्षिक अंदाजपत्रकाला मंजुरी देणे, तंटामुक्त समिती विषय विचारविनिमय करणे व अन्य विषयांवर चर्चा झाली. आयत्या वेळच्या विषयांवर चर्चा सुरू असताना बिरवाडी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सचिन बागडे यांनी ग्रामपंचायतीमार्फत नागरिकांना वेळेत दाखले उपलब्ध करून दिले जात नाहीत. या उलट सत्ताधारी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना ग्रामपंचायतींमधून तत्काळ दाखले मिळतात, असा आक्षेप घेतला. या दरम्यान ग्रामपंचायतीचे माजी सरपंच माधव बागडे यांनी बिरवाडी ग्रामपंचायतीची महिला सरपंच असताना या ठिकाणी काही नागरिक दारू पिऊन येतात दमदाटी करतात, असा प्रकार दुर्दैवी असल्याचे सांगतानाच ग्रामसभेशी निगडित नसलेला विषय सभागृहामध्ये उपस्थित केल्याने काँग्रेस कार्यकर्ते सचिन बागडे व माजी सरपंच माधव बागडे यांच्यात शाब्दिक बाचाबाची सुरू झाली. या गोंधळामध्ये ग्रामपंचायतीच्या सरपंच मेघना माधव बागडे यांनी हस्तक्षेप केल्याने ग्रामसभेचे अध्यक्ष शिवाजी तांबे असताना सरपंचांनी मध्ये बोलू नये, असा आक्षेप सचिन बागडे यांनी घेतल्याने ग्रामसभेमध्ये प्रचंड गोंधळ सुरू झाला. गोंधळाची परिस्थिती नियंत्रणात न आल्याने ग्रामसभेचे अध्यक्ष शिवाजी तांबे यांनी आपले अधिकार वापरून ग्रामसभा समाप्त करीत असल्याचे जाहीर करून या प्रकरणावर पडदा टाकला.

रात्रीच्या वेळी रु ग्णांची गैरसोय
च्बिरवाडी ग्रामपंचायतीमधील नागरिक केदार धारिया यांनी आपण बिरवाडी ग्रामपंचायतीकडे माहिती अधिकारामध्ये माहिती मागितली असून आपल्याला माहिती उपलब्ध होत नाही, त्यासोबतच दाखले देण्यात दिरंगाई का होते, असा प्रश्न उपस्थित केला.
च्यावर उत्तर देताना बिरवाडी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी नागनाथ घाडगे यांनी नागरिकांना दाखले वेळेत प्राप्त झाले पाहिजेत हा त्यांचा अधिकार असून दाखले घेऊन ग्रामपंचायतीचा कर्मचारी संबंधित व्यक्तीकडे गेला असता ती व्यक्ती उपलब्ध होऊ न शकल्याने दिरंगाई झाली असेल, असे सांगितले.
च्तर बिरवाडी ग्रामपंचायतींमधील प्रवीण गायकवाड यांनी खासगी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून रात्रीच्या वेळी रुग्णांची गैरसोय होत असल्याने याबाबत आरोग्य विभागाकडे पत्रव्यवहार करण्याची मागणी ग्रामसभेमध्ये करून ग्रामसभेच्या ठरावाची प्रत आरोग्यमंत्री आरोग्य विभागाच्या अधिकारी यांना पाठविण्यात यावी, असे नमूद केले.

Web Title: Shiv Sena-Congress workers get confused in Birwadi Gram Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड