शिवसेनेचे तीन सभापती तर एक सभापती पद आघाडीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 12:55 AM2020-12-16T00:55:27+5:302020-12-16T00:58:03+5:30

मुरुड नगरपरिषदेच्या स्थायी व विषय समित्यांच्या सभापतीपदाची निवड

Shiv Sena has three chairpersons and one chairperson | शिवसेनेचे तीन सभापती तर एक सभापती पद आघाडीला

शिवसेनेचे तीन सभापती तर एक सभापती पद आघाडीला

Next

n  लोकमत न्यूज नेटवर्क
आगरदांडा : कोरोनाच्या पाश्वभूमीवर व्हिडोओ काॅन्फरन्सिंगद्वारे मुरुड नगरपरिषदेच्या स्थायी व विषय समित्यांच्या सभापती सदस्यांची निवड मंगळवारी सकाळी मुरुड नगरपरिषदेच्या डाॅ.नानासाहेब धर्माधिकारी सभागृहात पार पडली. मुरुडचे तहसीलदार तथा या निवडणूक प्रक्रियेचे पीठासन अधिकारी गमन गावित यांच्या मार्गदर्शानाखाली संपन्न झाली.
मुरुड नगरपरिषदेत चार सभापती पदे आहेत. त्यापैकी तीन सभापती पदे शिवसेनेला, तर एक महिला व बालकल्याण सभापतीपद काँग्रेस राष्ट्रवादी व शेकाप आघाडीला मिळविण्यात यश प्राप्त झाले आहे. यावेळी सभागृह गटनेते मुग्धा जोशी यांनी आपल्या पक्षाकडून ४ सभापतीपदांसाठी व समिती सदस्यांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. बांधकाम व दिवाबत्ती सभापती मेघाली महेश पाटील, पाणीपुरवठा व जलनिस्सारण सभापती पांडुरंग कृष्णा आरेकर, पर्यटन व नियोजन समिती सभापती युगा योगेश ठाकूर यांचे उमेदवारी अर्ज एकमेव आल्याने ते बिनविरोध निवडून आल्याचे पीठासन अधिकारी गमन गावित यांनी घोषित केले. यावेळी मुख्याधिकारी अमित पंडीत व नायब तहसीलदार रवींद्र सानप, कार्यालयीन अधीक्षक परेश कुंभार, वरिष्ठ लिपिक नरेंद्र नादगांवकर आदी उपस्थित होते.

 आरोग्य व शिक्षण समिती सभापतीपदी उपनगराध्यक्ष नौसिन मुजफ्फर दरोगे, अशोक गणपत धुमाळ, विजय शंकर पाटील, अविनाश रामचंद्र दांडेकर, रिहाना इब्राहिम शहाबंदर.
 बांधकाम व दिवाबत्ती समिती सभापतीपदी मेघाली महेश पाटील, मुग्धा राजन जोशी, प्रमोद दत्तात्रेय भायदे, विश्वास बाबाजी चव्हाण, आशिष अरुण दिवेकर
पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती सभापती पांडुरंग कृष्णा आरेकर, प्रमोद दत्तात्रेय भायदे, मुग्धा राजन जोशी, अविनाश रामचंद्र दांडेकर, विश्वास बाबाजी चव्हाण.
 पर्यटन व नियोजन समिती सभापतीपदी युगा योगेश ठाकुर, अ. रहिम अ.हमीद कबले, अशोक गणपत धुमाळ, मंगेश मधुकर दांडेकर, मनोज हरिश्चंद्र भगत.

 महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी आरती गुरव व उपाध्यक्षपदी प्रांजली मकू, अनुजा दांडेकर, आरती गुरव, वंदना विनायक खोत समिती सभापती सदस्यपदी निवड झाली.
 स्थायी समिती अध्यक्षा नगराध्याक्षा स्नेहा किशोर पाटील तर सदस्यपदी, उपनगराध्यक्ष नौसिन मुजाफ्फर दरोगे, मेघाली महेश पाटील, पांडुरंग कृष्णा आरेकर, युगा योगेश ठाकुर, आरती श्रीकांत गुरव यांची निवड करण्यात आली.

सभापतींनी पदभार 
स्वीकारले 
नागरिकांनी दिलेल्या 
सत्तेचा जनतेच्या विकासासाठीच उपयोग करणार असल्याचे मत राष्ट्रीय काँग्रेस पक्षांच्या महिला व बाल कल्याण समिती सभापदी आरती गुरव व शेतकरी 
कामगार पक्षाच्या प्रांजली मकू यावेळी यांनी व्यक्त केले.
 

Web Title: Shiv Sena has three chairpersons and one chairperson

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.