शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
4
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
5
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
6
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
7
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
8
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
9
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
10
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
11
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
12
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
13
राहुल गांधींचे महाराष्ट्रातील ‘गॅरंटी कार्ड’ही फ्लॉप होणार : देवेंद्र फडणवीस 
14
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
15
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
16
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
17
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
18
इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले!
19
११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश 
20
‘राज’ की बात, भाजप अन् शिंदेंची अडचण!

रायगड जिल्ह्यातील तहसील कार्यालयांवर शिवसेनेचा मोर्चा, शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजारपर्यंत नुकसानभरपाई देण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 2:17 AM

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. कर्जत तालुक्यातील शेतकºयांना नुकसानभरपाई वेळेवर मिळावी यासाठी कर्जत तालुका शिवसेनेच्या वतीने तहसील कार्यालयावर सोमवारी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

कर्जत : अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. कर्जत तालुक्यातील शेतकºयांना नुकसानभरपाई वेळेवर मिळावी यासाठी कर्जत तालुका शिवसेनेच्या वतीने तहसील कार्यालयावर सोमवारी मोर्चाचे आयोजन करण्यात आलेहोते.कर्जत तालुका शिवसेनेच्या वतीने तहसीलदार विक्रम देशमुख यांना देण्यात आलेल्या निवेदनामध्ये ज्या शेतकºयांचे पंचनामे झाले नाहीत ते तत्काळ करण्यात यावेत, शेतकºयांना मिळणारी हेक्टरी आठ हजारांची मदत तुटपुंजी आहे, ती किमान हेक्टरी २५ हजारपर्यंत मिळावी, ज्यांचे पंचनामे झाले आहेत त्यांना मदत तात्काळ मिळावी, अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झाल्यामुळे भविष्यकाळात सुद्धा राज्य व केंद्र शासनाच्या वतीने योग्य कालावधीत योग्य मोबदला मिळावा, रब्बी पिकांची नुकसान भरपाई मिळावी. अवकाळी पावसामुळे शेतकºयांचे आर्थिक नुकसान झाले आहे, कर्जतमधील अनेक लोक शेती या व्यवसायावर अवलंबून असल्यामुळे त्यांना योग्य मोबदला मिळणे खूप आवश्यक आहे, तो न मिळाल्यास कर्जत तालुका शिवसेनेच्या वतीने आज मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे; परंतु नुकसान भरपाई वेळेवर न मिळाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन शेतकरी कर्जत तालुका शिवसेनेच्या वतीने केले जाईल असा इशारा निवेदनाच्या शेवटी दिला आहे.कर्जतमधील पोलीस मैदानावरून निघालेला मोर्चा बाजारपेठे मार्गे तहसील कार्यालयावर पोहोचला. यावेळी कर्जत तालुका शिवसेनाप्रमुख उत्तम कोळंबे उपजिल्हाप्रमुख भाई गायकर, कर्जत विधानसभा संघटक संतोष भोईर, उपतालुका प्रमुख दशरथ भगत, बाबू घारे, तालुका संघटक शिवराम बदे, जिल्हा परिषद सदस्या सहारा कोळंबे, सभापती राहुल विशे, माजी सभापती मनोहर थोरवे आदी उपस्थित होते.कर्जत विधानसभा संघटक संतोष भोईर यांनी आज आपण परिस्थिती बघितली तर शेतकºयांनी लागवड केलेले पीक या पावसामुळे पूर्णपणे खराब झालेले आहे, तालुक्यामध्ये भात लागवड जास्त प्रमाणात केली जाते, आणि ही लागवड केल्यानंतर लागवडीचा खर्च पाहता शेतकºयांना उभ्या असलेल्या पिकांमध्ये काही मिळत नाही. शासनाने हेक्टरी ८ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले आहे ही रक्कम हेक्टरी २५हजार रुपये द्यावी असे सांगितले.अलिबाग : ‘जिल्ह्यातील शेतकºयांना नुकसानभरपाई द्या’ अवकाळी पावसाने जिल्ह्यातील हजारो शेतकºयांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. अद्यापही शेतकºयांना नुकसान भरपाई मिळालेली नाही. जिल्ह्यात तालुकास्तरावर तहसीलदारांना शिवसेनेच्या शिष्टमंडळानी निवेदन दिले. नुकसानग्रस्त शेतकºयांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देऊन २५ हजार हेक्टरी रक्कम द्यावी अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळानी जिल्ह्यातील तहसीलदारांना निवेदनाद्वारे केली आहे. अवेळी पावसाने जिल्ह्यातील ८० टक्के भातशेतीचे नुकसान झाले. त्यामुळे हजारो शेतकºयांच्या भातशेतीचे नुकसान झाले आहे. हाताशी आलेले पीक पावसाने वाया गेले.२शासनाकडून नुकसान झालेल्या भातशेतीचे पंचनामे करण्यात आलेले आहेत. मात्र अद्यापही शेतकºयांना नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकरी हा हवालदिल झाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकºयांच्या या समस्येबाबत तालुकास्तरावर तहसीलदारांना भेटून नुकसान भरपाई मिळून देण्याबाबत शिवसैनिकांना आदेश दिल्याचे अलिबाग तालुका प्रमुख राजा केणी यांनी सांगितले. त्यानुसार सोमवारी जिल्ह्यातील अलिबाग, पेण, पनवेल, खालापूर, कर्जत, महाड, पोलादपूर, श्रीवर्धन, उरण तहसील कार्यालयावर शिवसेनेने मोर्चा काढून तहसीलदारांना निवेदन दिले.आगरदांडा : भात पीक, सुपारी, आंबा बागांचे मोठे नुकसानशेतक-यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी याकरिता मुरुड शिवसेना तालुक्याच्या वतीने मुरुड तहसीलदार गमन गावीत यांना निवेदन देण्यात आले. राज्यात दुष्काळ परिस्थितीमुळे शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात शेती, बागांचे नुकसान झाले आहे. पंरतु शासनाने हेक्टरी ८ हजार एवढी तुटपुंजी मदत जाहीर केलेली आहे. तसेच किसान सन्मान योजनेच्या अनुदानापासून अद्यापही बरेच शेतकरी वंचित आहेत. अवकाळी पाऊस पडल्याने मुरुड तालुक्यात शेतक-यांच्या हाता तोंडाशी आलेला घास गेल्याने संपूर्ण तालुक्यात भातशेती, सुपारी बागा, आंबा बागा, भाजीपाला या सा-या पिकांचे नुकसान झाले.आज शेतक-याला हेक्टरी ३० हजार रुपये नुकसान भरपाई तातडीने मिळावी तसेच शेतक-यांचा सातबारा उतारा कोरा व्हावा, हवालदिल झालेल्या शेतक-यांचे पूनर्वसन करण्याकरिता वीज बील माफ व्हावे शेतक-यांच्या मुलांना शिक्षण फी माफ व्हावी. शासकीय कर वसूली माफ व असमानी संकटातून शेतक-यांला मुक्ती मिळावी अशी मागणी या निवेदनात के ली आहे. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रशांत मिसाळ, शिवसेना तालुका प्रमुख ॠषिकांत डोंगरीकर, नगराध्यक्षा स्नेहा पाटील आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.रोहा : रोह्यात शिवसेनेचा मोर्चा; तहसीलवर धडकलांबलेल्या पावसाने उध्वस्थ झालेल्या शेतकºयांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी रोहा तालुका शिवसेने सोमवारी माजी तालुकाप्रमुख आणि सल्लागार अ‍ॅड. मनोजकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून रोहा तहसिलदारांना निवेदन दिले. राज्यातील शेतकरी व मच्छीमार यांचे परतीच्या पावसाने अतोनात असे नुकसान झाले आहे. संकटात सापडलेल्या या जगाच्या पोशिंद्याना शासनातर्फे भरघोस मदत मिळवून न्याय देण्यासाठी मोर्चे , आंदोलने करा असा आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या शिवसैनिकांना दिला आहे. त्याला अनुसरून रोहा शिवसेनेने सोमवारी रोहा तहसील कार्यालयावर मोर्चा काढत निवेदन दिले.रोहा शहरातील तीनबत्ती नाका येथून या मोचार्ला सुरुवात झाली. पुढे फिरोझ टॉकीज मार्गे रोहा तहसील कार्यालयापर्यंत हा मोर्चा नेण्यात आला.तहसील कार्यलय परिसरात मोर्चा आल्यानंतर रोहा तहसीलदार कविता जाधव यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेना कायदेशीर सल्लागार अ‍ॅड, मनोजकुमार शिंदे, अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष उस्मान रोहेकर, डॉ. अवनी शेडगे, श्वेता खेरटकर आदि उपस्थित होते. रोहा पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर यांनी यावेळी चोख बंदोबस्त ठेवला होता.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाRaigadरायगडFarmerशेतकरी