रायगडमध्ये शिवसेनेचे सर्वाधिक २९ सरपंच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2019 05:47 AM2019-02-26T05:47:39+5:302019-02-26T05:48:31+5:30
९० ग्रामपंचायतींच्या निवडणुका : शेकापला आठ पंचायतींत धक्का, भाजपाचाही दिसला प्रभाव
- जयंत धुळप
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील ११ तालुक्यांतील ९० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांच्या परीक्षेत शिवसेनेने सर्वाधिक यश मिळवले. रायगड जिल्ह्यातील आपला दबदबा राखण्याचा प्रयत्न शेकापने केला असला, तरी आठ पंचायती त्यांना गमवाव्या लागल्या. राष्ट्रवादीलाही निर्भेळ यश मिळाले नाही. त्या पक्षाला कहीं खुशी कहीं गमचा अनुभव आला. काँग्रेसला धक्का देण्याचे विरोधकांचे प्रयत्न सुरू असले, तरी तो पक्षही ग्रामीण भागात स्थान टिकवून असल्याचे दिसून आले. ग्रामीण भागात आजवर फारसे स्थान नसलेल्या भाजपाने चार पंचायती मिळवत रायगडच्या राजकारणात चंचूप्रवेश केल्याचे दाखवून दिले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या निवडणुकानिमित्ताने ग्रामीण भागातील मतदारांचा कल सर्व पक्षांना तपासून पाहता आला.
११ ग्रामपंचायतींची निवडणूक बिनविरोध झाली होती. या पंचायतींत शिवसेनेचे सर्वाधिक २९ ,शेतकरी कामगार पक्षाचे २२, राष्ट्रवादी काँग्रेसचे १९ थेट सरपंच निवडून आले. जिल्ह्यात काँग्रेसचा एकही आमदार नसताना काँग्रेसने १० ग्रामपंचायतीत थेट सरपंच निवडून आणून आपण प्रगतिपथावर असल्याचे सिध्द केले आहे. केंद्रात आणि राज्यात सत्तेत असलेल्या आणि जिल्ह्यात आमदार असलेल्या भाजपाला चार ग्रामपंचायतीत थेट सरपंचपद मिळवता आली. दरम्यान, राजकीय पक्षाचे अस्तित्व बाजूला ठेवून स्थानिक पातळीवर झालेल्या आघाड्यांनी ६ थेट सरपंच पदे काबीज केली आहेत.
महाडचे आमदार भरत गोगावले यांनी तालुक्यात १७ पैकी १३ ग्रामपंचायतीत शिवसेनेस यश मिळवून देवून, काँग्रेसचे माजी आमदार आणि जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष माणिक जगताप यांना चांगलाच धक्का दिला. काँग्रेस आणि काँग्रेस-शिवसेना आघाडी यांना प्रत्येकी एका ग्रामपंचायतीवर समाधान मानावे लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस व आगामी लोकसभा निवडणुकीतील उमेदवार सुनील तटकरे यांचे माणगाव श्रीवर्धन, म्हसळा आणि तळा तालुक्यांत सातत्याने राहिलेले वर्चस्व या निवडणुकीतही त्यांनी अबाधित राखले. ते परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. श्रीवर्धनमध्ये ४ पैकी तीन ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसने तर एक शिवसेनेने, म्हसळा तालुक्यात चारपैकी तीन राष्ट्रवादी काँग्रेसने तर एक ग्रामपंचायत भाजपाने, तळा तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींपैकी चार राष्ट्रवादी काँग्रेसने तर एक ग्रामपंचायत स्थानिक आघाडीने, रोहा तालुक्यातील सहापैकी प्रत्येकी दोन शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्थानिक आघाडीने तर माणगाव तालुक्यातील १० पैकी सर्वाधिक सहा ग्रामपंचायती राष्ट्रवादी काँग्रेसने, शिवसेनेने तीन तर स्थानिक आघाडीने एक ग्रामपंचायत काबीज केल्याने तटकरे यांनी आपले वर्चस्व अबाधित राखले आहे. रोह्यात सुनील तटकरे यांचे पुतणे आमदार अवधूत तटकरे यांचा गट स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात होता.
कर्जत तालुक्यातील ८ ग्रामपंचायतींपैकी सर्वाधिक सहा ग्रामपंचायती शिवसेनेने मिळवल्या. आिपली पूर्वीची जागा पुन्हा मिळविण्यात आम्ही सज्ज होत असल्याचे दाखवून दिले. सुरेश लाड यांना कर्जत नगरपालिका निवडणुकीनंतर हा दुसरा मोठा राजकीय धक्का आहे. शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी एका ग्रामपंचायतीवर येथे समाधान मानावे लागले आहे.
पेण तालुक्यात पाचपैकी चार ग्रामपंचायती शेकापने काबीज केल्या. त्याच वेळी काँग्रेसचे माजी मंत्री रवि पाटील यांनी भाजपात प्रवेश केल्याने एका ग्रामपंचायतीत भाजपाला या विधानसभा मतदार संघात प्रथमच यश मिळाले. परिणामी येत्या विधानसभेला शेकाप विरुद्ध भाजपा अशी लढत द्यायला आम्ही सज्ज होत असल्याचा सुप्त इशारा माजी मंत्री रवि पाटील यांनी दिला आहे.
पनवेल तालुक्यातील दोनपैकी प्रत्येकी एक ग्रामपंचायत भाजपा आणि शेकापने आपल्याकडे राखली आहे. उरण तालुक्यातील एका ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाने विजय संपादन केला आहे. मात्र जिल्ह्यात भाजपा यश मिळवू शकलेला नाही.
अलिबागमध्ये सर्वाधिक जागा
च्अलिबाग तालुक्यात सर्वाधिक २५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत्या. त्यात काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस- भाजपा- शिवसेना अशा सर्वपक्षीय आघाड्या होऊन देखील शेकापने १३ ग्रामपंचायतीत बाजी मारली. या तालुक्यातील आपले वर्चस्व त्यांनी अबाधित राखले असले तरी आपल्या ताब्यातील आठ ग्रामपंचायती शेकापला गमवाव्या लागल्या आहेत.
च्काँग्रेस, शिवसेनेला प्रत्येकी सहा पंचायती मिळाल्या. मुरुड तालुक्यात तीनपैकी प्रत्येकी एक शेकाप, काँग्रेस, स्थानिक आघाडीने काबीज केली आहे. अलिबाग-मुरुडचे शेकापचे आमदार पंडित पाटील आणि शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी वर्चस्व कायम असल्याचे दाखवून दिले.
अलिबाग तालुक्यात सर्वाधिक २५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत्या. त्यात काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस- भाजपा- शिवसेना अशा सर्वपक्षीय आघाड्या होऊन देखील शेकापने १३ ग्रामपंचायतीत बाजी मारली. या तालुक्यातील आपले वर्चस्व त्यांनी अबाधित राखले असले तरी आपल्या ताब्यातील आठ ग्रामपंचायती शेकापला गमवाव्या लागल्या आहेत.
च्काँग्रेस, शिवसेनेला प्रत्येकी सहा पंचायती मिळाल्या. मुरुड तालुक्यात तीनपैकी प्रत्येकी एक शेकाप, काँग्रेस, स्थानिक आघाडीने काबीज केली आहे. अलिबाग-मुरुडचे शेकापचे आमदार पंडित पाटील आणि शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी वर्चस्व कायम असल्याचे दाखवून दिले.