वडगावमध्ये शिवसेना; सरपंचपदी गौरी गडगे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 11:53 PM2019-02-15T23:53:16+5:302019-02-15T23:53:20+5:30
खालापूर तालुक्यातील वडगाव गु्रप ग्रामपंचायतीची निवडणूक होऊन थेट सरपंचपदी गौरी गडगे या निवडून आल्या. तर उपसरपंचपदी सुजाता पाटील विराजमान झाल्याने या ग्रामपंचायतीवर १५ वर्षे असणारी राष्ट्रवादीची सत्ता उलथवून लावत शिवसेनेने भगवा फडकविला आहे.
मोहोपाडा : खालापूर तालुक्यातील वडगाव गु्रप ग्रामपंचायतीची निवडणूक होऊन थेट सरपंचपदी गौरी गडगे या निवडून आल्या. तर उपसरपंचपदी सुजाता पाटील विराजमान झाल्याने या ग्रामपंचायतीवर १५ वर्षे असणारी राष्ट्रवादीची सत्ता उलथवून लावत शिवसेनेने भगवा फडकविला आहे.
वडगाव ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीवर मात करीत शिवसेनेच्या गौरी गडगे थेट सरपंचपदी निवडून आल्या. थेट जनतेतून निवडून आलेले गौरी गडगे, तर उपसरपंचपदी सुजाता पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या वेळी खेळीमेळीच्या वातावरणात ही निवड करण्यात आली. सरपंचपदाच्या निवड प्रक्रि येचे काम ग्रामविकास अधिकारी प्रशांत कदम व निरीक्षक मोहन पुजारी यांनी पाहिले. ढोलताशे फटाक्यांच्या आतशबाजीत कैरे, बोरीवली, वाशिवली, तलवली व वडगाव अशी मिरवणूक काढण्यात आली. या वेळी मावळचे खासदार आप्पा बारणे, आमदार मनोहर भोईर आदीनी शुभेच्छा दिल्या.