कर्जत : कर्जत तालुक्यातील दोन ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल सोमवारी ९ डिसेंबर रोजी जाहीर झाले. या निकालात दोन्ही ग्रामपंचायती राष्ट्रवादीकडून शिवसेनेने ताब्यात घेतल्या आहेत. या दोन्ही ग्रामपंचायतींवर यापूर्वी राष्ट्रवादी काँगेसची सत्ता होती. दरम्यान वरईतर्फे निड ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेने एक हाती सत्ता मिळविली आहे. तर तिवरे ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेने थेट सरपंचपद मिळविले असले, तरी ९ प्रभागांपैकी ५ ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे याठिकाणी उपसरपंच पदी राष्ट्रवादी काँग्रेसची सरशी होण्याची चिन्हे आहेत.
कर्जत तालुक्यातील वरई आणि तिवरे या दोन ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका ८ डिसेंबर रोजी पार पडल्या. त्या अगोदर वरई तर्फे निड ग्रामपंचायतीमध्ये हाणामारीचा प्रकार घडला होता. त्यामुळे ९ डिसेंबर रोजी या दोन्ही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार असल्याने कर्जत पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. सकाळी १० वाजता कर्जत तहसील कार्यालय येथे मतमोजणीला सुरवात करण्यात आली.
वरई तर्फे निड या ग्रामपंचायतीत थेट सरपंचपद सर्वसाधारण असल्याने त्या ठिकाणी समीर देहू ठाकरे आणि सुरेश तानाजी फराट यांच्यात सरळ लढत होती. त्यापैकी शिवसेनेचे सुरेश तानाजी फराट यांनी एकूण ७८७ मते घेत समीर देहू ठाकरे यांचा २०१ मतांने पराभव केला.
तर तेथील ९ सदस्यांसाठी दाखल झालेल्या अर्जांपैकी १६ जणांनी माघार घेतल्याने ९ सदस्यां पैकी पाच जागा बिनविरोध झाल्या होत्या. त्यामुळे ४ जागांसाठी निवडणूक घेण्यात आली होती. त्या चारही जागा शिवसेनेने जिंकल्या आहेत. तेथे प्रभाग क्रमांक १ मधून राजश्री राजेंद्र ठाकरे, प्रभाग क्रमांक ३ मधून योगेश संजय मुकणे, रमेश नारायण चोरगे, दक्षता दत्तात्रेय देशमुख यांनी विजय संपादन केला आहे.तर वरई ग्रामपंचायत मधील प्रभाग १ मधील दोन जागा बिनविरोध झाल्या होत्या तेथे देवेंद्र नारायण जाधव आणि रविना रवींद्र भुसारी हे बिनविरोध निवडून आले होते. प्रभाग २ मधील सर्व तीन सदस्य बिनविरोध निवडले गेले असून त्यात महेश दत्ता मोडक, सुगंधा वासुदेव मोडक आणि नयना वासुदेव धुळे हे बिनविरोध निवडून आले आहेत.
तिवरे ग्रामपंचायतीवर शिवसेनेची सत्ता
तिवरे ग्रामपंचायतीचे थेट सरपंच पद हे अनुसूचित जमाती महिला राखीव होते. तेथे उमेदवारी अर्ज भरणाऱ्या सरिता हरिश्चंद्र दगडे यांनी आपला नामांकन अर्ज मागे घेतला, त्यामुळे शिवसेनेच्या चंद्राबाई कुंडलिक वळवे या थेट सरपंच पदावर बिनविरोध निवडून आल्या. तिवरे ग्रामपंचायतीमधील ९ जागांसाठी अर्ज दाखल करणाºया १७ उमेदवारांनी आपले नामांकन अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे सात सदस्य बिनविरोध निवडून आले असून दोन जागांसाठी चार उमेदवारांमध्ये निवडणूक झाली. प्रभाग १ मधून अनिल किसन पवार हे बिनविरोध निवडून आले होते. तेंव्हा इतर दोन जागांसाठी झालेल्या सरळ लढतीत अपर्णा नरेश दगडे, जना मुकुंद पवार हे विजयी झाले आहेत. प्रभाग २ मधून सर्व तीन उमेदवार बिनविरोध निवडून गेले असून त्यात संतोष रघुनाथ भासे, चित्रा सदानंद भासे, योगिता रवींद्र भासे यांचा समावेश आहे. तर प्रभाग ३ मधून संजय गणपत तिखंडे, वैशाली केशव ठाकरे, उज्वला चंद्रकांत ठाकरे हे तीन उमेदवार बिनविरोध निवडून गेले आहेत.
पोलादपूर : तालुक्यातील रविवारी झालेल्या बोरज ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाचे भरत चोरगे यांनी शिवसेनेचे शिवाजी मालुसरे यांचा दणदणीत पराभव करत ११५ मतांनी विजय मिळवला.च्बोरज ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ३ मधील एका सर्वसाधारण जागेसाठी झालेल्या निवडणुकीत ४०३ मतदारांपैकी २६४ मतदारांनी हक्क बजावला होता.
सोमवारी तहसील कार्यालयात झालेल्या मतमोजणीत काँग्रेसचे विजयी उमेदवार भरत चिमा चोरगे यांना २०३ मते मिळाली तर शिवसेनेचे पराभूत उमेदवार शिवाजी मालुसरे यांना ८८ मते तर नोटाला ४ मते मिळाली. भरत चोरगे यांनी११५ माताधिक्यांनी विजय मिळवत काँग्रेसचा बालेकिल्ला मजबूत केला आहे.
च्विजयी उमेदवार भरत चोरगे यांचे पोलादपूर काँग्रेस चे तालुकाध्यक्ष अजय सलागरे, उपसभापती शैलेश सलागरे आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अभिनंदन केले .